Lokmat Money >शेअर बाजार > Closing Bell: सेन्सेक्स १२४१ अंकांच्या वाढीसह बंद, निफ्टीतही तेजी; ४७३ शेअर्स वर्षभराच्या उच्चांकी स्तरावर

Closing Bell: सेन्सेक्स १२४१ अंकांच्या वाढीसह बंद, निफ्टीतही तेजी; ४७३ शेअर्स वर्षभराच्या उच्चांकी स्तरावर

बँकिंग शेअर्स आणि हेवीवेट शेअर्समध्ये वाढ झाल्याने आज बाजारात मोठी तेजी दिसून आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 04:12 PM2024-01-29T16:12:39+5:302024-01-29T16:12:58+5:30

बँकिंग शेअर्स आणि हेवीवेट शेअर्समध्ये वाढ झाल्याने आज बाजारात मोठी तेजी दिसून आली.

Closing Bell Sensex closes up 1241 points Nifty also up 473 shares at a one year high | Closing Bell: सेन्सेक्स १२४१ अंकांच्या वाढीसह बंद, निफ्टीतही तेजी; ४७३ शेअर्स वर्षभराच्या उच्चांकी स्तरावर

Closing Bell: सेन्सेक्स १२४१ अंकांच्या वाढीसह बंद, निफ्टीतही तेजी; ४७३ शेअर्स वर्षभराच्या उच्चांकी स्तरावर

Stock Market Closing Bell: बँकिंग शेअर्स आणि हेवीवेट शेअर्समध्ये वाढ झाल्याने आज बाजारात मोठी तेजी दिसून आली. देशांतर्गत इक्विटी बाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी 50 हे दोन्ही दीड टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले. आज इंट्रा-डेमध्ये सेन्सेक्सने 72 हजार आणि निफ्टीने 21750 चा टप्पा ओलांडला होता. बाजाराच्या या जबरदस्त वाढीमध्ये बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप आज सुमारे 6 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे, म्हणजेच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज 6 लाख कोटी रुपयांची वाढ झाली. आज निफ्टीवरील 40 शेअर्स आणि सेन्सेक्सवरील 25 शेअर्स ग्रीन झोनमध्ये बंद झाले.

आता इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांबद्दल सांगायचं झाल्यास, आज सेन्सेक्स 1240.90 अंकांच्या किंवा 1.76 टक्क्यांच्या उसळीसह 71941.57 वर बंद झाला आणि निफ्टी 385.00 अंकांच्या किंवा 1.80 टक्क्यांच्या उसळीसह 21737.60 वर बंद झाला. तर दुसरीकडे आज निफ्टी एफएमसीजी निर्देशांक वगळता इतर सर्व निर्देशांक वाढीसह बंद झाले. निफ्टी एफएमसीजी देखील केवळ 0.14 टक्क्यांनी घसरला. तर निफ्टी बँक 1.28 टक्क्यांनी आणि निफ्टी ऑइल अँड गॅस 5.18 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला आहे.

गुंतवणूकदारांनी कमावले 6 लाख कोटी

बाजारातील जोरदार तेजीमुळे आज गुंतवणूकदारांच्या भांडवलात वाढ झाली. यापूर्वीच्या ट्रेडिंगच्या दिवशी म्हणजे 25 जानेवारी 2024 रोजी, BSE वर लिस्टेड सर्व शेअर्सचं एकूण मार्केट कॅप 371.12 लाख कोटी रुपये होतं. 29 जानेवारी 2024 रोजी ते 377.12 लाख कोटी रुपयांवर पोहोचला. याचा अर्थ आज गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 6 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

5 शेअर्स रेड झोनमध्ये

सेन्सेक्सवरील 30 लिस्टेड शेअर्सपैकी फक्त 5 रेड झोनमध्ये बंद झाले. टाटा मोटर्स, पॉवरग्रिड आणि एलअँडटीमध्ये सर्वाधिक नफा झाला. दुसरीकडे, आयटीसी, इन्फोसिस आणि जेएसडब्ल्यू स्टीलमध्ये आज सर्वाधिक घसरण झाली.

473 शेअर्स वर्षभराच्या उच्चांकी स्तरावर

बीएसईवर उपलब्ध माहितीनुसार, आज 4061 शेअर्सचे व्यवहार झाले, त्यापैकी 2268 मध्ये वाढ झाली, तर 1652 मध्ये घसरण आणि 141 मध्ये कोणताही बदल झाला नाही. तर 473 शेअर्सनं एका वर्षातील उच्चांकी स्तर गाठला आणि 26 समभागांनी एका वर्षातील नीचांकी पातळी गाठली. याशिवाय 538 शेअर्स अपर सर्किटमध्ये तर 265 शेअर्स लोअर सर्किटमध्ये आले.

Web Title: Closing Bell Sensex closes up 1241 points Nifty also up 473 shares at a one year high

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.