Closing Bell: देशांतर्गत शेअर बाजार आज तेजीसह बंद झाले. बीएसई सेन्सेक्स 164.99 अंकांच्या म्हणजेच 0.25 टक्क्यांच्या वाढीसह 65,558.89 अंकांच्या पातळीवर बंद झाला. दिवसभराच्या कामकाजादरम्यान सेन्सेक्सने 66 हजारांचा टप्पादेखील ओलांडला होता. त्याच वेळी, NSE निफ्टीनं 19550 अंकांची पातळी ओलांडली. एनएसई निफ्टी 29.45 अंकांनी म्हणजेच 0.15 टक्क्यांच्या वाढीसह 19,413.75 वर बंद झाला. निफ्टीमध्ये टीसीएसचे शेअर्स 2.60 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.
या शेअर्समध्ये वाढ
बीएसई सेन्सेक्समध्ये टीसीएसच्या शेअर्समध्ये 2.47 टक्क्यांची वाढ झाली. यासह, इन्फोसिसचे शेअर्स 2.40 टक्क्यांनी, बजाज फिनसर्व्ह, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बँक आणि अॅक्सिस बँकेचे शेअर्स प्रत्येकी एक टक्का वाढीसह बंद झाले.
या शेअर्समध्ये घसरण
सेन्सेक्सवर पॉवर ग्रिडच्या शेअरमध्ये सर्वाधिक 3.35 टक्क्यांची घसरण दिसून आली. याशिवाय मारुती, एनटीपीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचयूएल, नेस्ले इंडिया, एसबीआय, कोटक महिंद्रा बँक, भारती एअरटेल, टायटन, एशियन पेंट्स, जेएसडब्ल्यू स्टील, सन फार्मा आणि एचसीएल टेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.
रुपया 17 पैशांनी मजबूत
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 17 पैशांनी मजबूत होऊन 82.07 वर पोहोचला. मागील सत्रात तो 82.24 च्या पातळीवर बंद झाला होता.