Join us  

Closing Bell: सेन्सेक्स ८०१ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; टाटा मोटर्समध्ये बंपर तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 4:11 PM

पाहा कोणत्या शेअर्समध्ये झाली घसरण आणि कोणते शेअर्स वधारले.

मंगळवारी सुरुवातीच्या वाढीनंतर दिवसभर  शेअर बाजारात चढ-उतार दिसून आला आणि कामकाजाच्या शेवटी बीएसएई सेन्सेक्स 801 अंकांनी घसरुन 71140 च्या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 209 अंकांनी घसरून 21528 च्या पातळीवर बंद झाला. शेअर बाजारात मंगळवारी टाटा मोटर्समध्ये बंपर वाढ नोंदवण्यात आली आणि कंपनीच्या शेअर्सनं 865 रुपयांची पातळी गाठली.

बीपीसीएलच्या शेअर्समध्येही दोन टक्क्यांनी वाढ झाली आणि कंपनीचे शेअर्स 502.70 रुपयांच्या पातळीवर पोहोचले. आयशर मोटर्स आणि अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये एक टक्का वाढ नोंदवण्यात आली. शेअर बाजारात घसरण झालेल्या कंपन्यांबद्दल बोलायचे तर विप्रो, टाटा स्टील, कोटक बँक, जेएसडब्ल्यू स्टील, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस आणि नेस्ले यांच्या शेअर्समध्ये मंगळवारी घसरण दिसून आली. 

मंगळवारी, शेअर बाजाराच्या कामकाजात लक्षणीय घसरण नोंदवली गेली आणि बीएसई सेन्सेक्स 800 हून अधिक अंकांनी घसरून 71,100 च्या पातळीवर तर निफ्टी 21,550 अंकांच्या खाली पोहोचला. शेअर बाजारात तेजी असलेल्या शेअर्समध्ये टाटा मोटर्स, बीपीसीएल, आयशर मोटर्स, ग्रासिम इंडस्ट्रीज, अदानी एंटरप्रायझेस, एसबीआय आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांचा समावेश होता, तर घसरण झालेल्या शेअर्समध्ये बजाज फायनान्स, टायटन, अल्ट्राटेक सिमेंट, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, एनटीपीसी, आयटीसी, बजाज फिनसर्व्हचे शेअर्स यांचा समावेश होता.

52 आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर

टाटा मोटर्सचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले, तर बीपीसीएल, बजाज ऑटो, पॉवर ग्रिड, हीरो मोटोकॉर्प, इन्फोसिस आणि ओएनजीसीचे शेअर्स देखील 52 आठवड्यांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ ट्रेड करत आहेत.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजार