Join us  

सेन्सेक्समध्ये २२० अंकांची उसळी, निफ्टी १९७०० पार; गुंतवणूकदारांनी कमावले १.५७ लाख कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 4:27 PM

दुपारच्या सत्रात भारतीय शेअर बाजारात मजबूती दिसून आली.

Stock Market closing Result: अमेरिकन बाजारातील कमकुवत कल आणि सतत परकीय निधीचा आऊटफ्लो यामुळे बुधवारी सकाळच्या सत्रात देशांतर्गत शेअर बाजारात घसरण दिसून आली. परंतु इंट्राडे ट्रेडिंगमध्ये वाढ झाल्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मजबूती दिसून आली. सेन्को गोल्डचा शेअर 14 टक्क्यांनी वधारला, तर वेदांताच्या शेअरमध्ये 7 टक्क्यांनी घसरण झाली.दुपारच्या सत्रात भारतीय शेअर बाजारात मजबूती दिसून आली. कामकाजाच्या अखेरच्या सत्रात सेन्सेक्स 223.76 अंकांच्या किंवा 0.34 टक्क्यांच्या वाढीसह 66,169.23 वर बंद झाला. त्याचप्रमाणे एनएसई निफ्टी 63.55 अंकांनी किंवा 0.32 टक्क्यांनी वाढून 19,728.25 च्या पातळीवर बंद झाला.हे शेअर्स वधारलेसेन्सेक्समधील 30 पैकी केवळ 13 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्येही लार्सन अँड टुब्रोच्या (L&T) शेअर्समध्ये सर्वाधिक 1.94 टक्क्यांची वाढ झाली. यानंतर आयटीसी, सन फार्मा, मारुती सुझुकी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे (RIL) शेअर्समध्ये वाढ दिसून आली.हे शेअर्स घसरलेतर सेन्सेक्समधील उर्वरित 17 शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. टायटनचे शेअर्स 1.24 टक्क्यांनी घसरले. याशिवाय स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये 0.43 ते 0.77 टक्क्यांची घसरण दिसून आली.कमावले १.५७ लाख कोटीबीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 22 सप्टेंबर रोजी वाढून 319.72 लाख कोटी रुपये झाले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच मंगळवारी 318.15 लाख कोटी रुपये होते. अशा प्रकारे, बीएसईमध्ये लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 1.57 लाख कोटी रुपयांनी वाढलं. दुसऱ्या शब्दांत सांगायाचं झालं तर गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.57 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

टॅग्स :शेअर बाजार