Join us

Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या तेजीसह बंद; आयशर मोटर्समध्ये बंपर तेजी, अदानी पोर्ट्स घसरला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2024 4:20 PM

शेअर बाजारात लिस्टेड सर्व कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप प्रथमच 400 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेलं आहे.

Closing Bell Today: नवीन आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजाराचा व्यवसाय तेजीसह बंद झाला. बीएसई सेन्सेक्स 494 अंकांनी वाढून 74742 अंकांच्या पातळीवर बंद झाला, तर निफ्टी 152 अंकांच्या वाढीसह 22666 अंकांच्या पातळीवर बंद झाला. सोमवारी सेन्सेक्स आणि निफ्टीने आजवरचा नवीन उच्चांक गाठला. जर सेक्टरनुसार सांगायचं झालं तर, ऑटो आणि रिॲलिटी हे राष्ट्रीय शेअर बाजारातील सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या क्षेत्रांपैकी एक होते. 

शेअर बाजाराने आजच्या बंपर वाढीसह दोन नवे विक्रम रचले आहेत. एकीकडे सेन्सेक्स-निफ्टीने नवा उच्चांक गाठला, तर दुसरीकडे शेअर बाजारात लिस्टेड सर्व कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप प्रथमच 400 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेलं आहे. ऑटो आणि मेटल शेअर्स शेअर बाजारात सर्वाधिक तेजीत होते. जेएसडब्ल्यू स्टील, श्रीराम फायनान्स, मारुती सुझुकी, महिंद्रा, आयशर मोटर्स, एनटीपीसी या कंपन्यांचे शेअर्स टॉप गेनर्सच्या यादीत तर, नेस्ले इंडिया, अपोलो, विप्रो, एलटीआय माइंडट्री, सन फार्मा, एचसीएल टेक या कंपन्यांचे शेअर्स टॉप लुझर्सच्या यादीत होते. 

कोण टॉप लुझर/गेनर? 

सोमवारी शेअर बाजारातील सर्वाधिक तेजी असलेल्या आयशर मोटर्सच्या शेअर्समध्ये चार टक्क्यांहून अधिक वाढ झाली. मारुती सुझुकी, महिंद्रा, एनटीपीसी, एसबीआय लाईफ, जेएसडब्ल्यू स्टील आणि ग्रासिम इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्येही तेजी दिसून आली. शेअर बाजारातील टॉप लूजर्सबद्दल बोलायचं झाल्यास, यामध्ये अदानी पोर्ट्स, नेस्ले इंडिया, अपोलो हॉस्पिटल, विप्रो, सन फार्मा, एलटीआय माइंडट्री आणि एचसीएल टेक यांच्या शेअर्सचा समावेश होता.

टॅग्स :शेअर बाजार