Join us

Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; अदानी एन्टरप्राईजेसमध्ये तेजी, Cipla घसरला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 4:08 PM

Closing Bell Today: कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी शेअर बाजारातील कामकाज तेजीसह बंद झालं. बीएसई सेन्सेक्स 328 अंकांच्या वाढीसह 73104 अंकांवर बंद झाला

Closing Bell Today: कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी शेअर बाजारातील कामकाज तेजीसह बंद झालं. बीएसई सेन्सेक्स 328 अंकांच्या वाढीसह 73104 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 114 अंकांच्या तेजीसह 22218 अंकांवर बंद झाला. मंगळवारच्या सत्रात अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स पाच टक्क्यांहून अधिक वधारले, तर सिप्लाचे शेअर्स चार टक्क्यांहून अधिक घसरून बंद झाले. 

शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी नोंदविण्यात आली असून निफ्टी 22200 च्या वर बंद होण्यात यशस्वी झाला आहे. महिंद्रा अँड महिंद्रा आणि लार्सन अँड टुब्रो च्या शेअर्समध्ये मंगळवारच्या कामात चांगली वाढ नोंदवण्यात आली. 

दिवसभर तेजीचा जोर 

मंगळवारी शेअर बाजाराच्या कामकाजात मोठ्या प्रमाणात चढ-उतार झाले आणि बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी दिवसभर ग्रीन झोनमध्ये काम करत होते. दुपारी शेअर बाजारात घसरण झाली असली तरी कामकाजाचा अखेरच्या तासात पुन्हा तेजी दिसून आली. 

टॉप गेनर आणि लूझर कोण 

शेअर बाजाराच्या कामकाजात चांगली तेजी आल्याने निफ्टी फार्मा आणि निफ्टी एफएमसीजी निर्देशांक किरकोळ घसरणीसह ट्रेड करत होते. तर इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक ग्रीन झोनमध्ये कार्यरत होते. अदानी एंटरप्रायझेस, महिंद्रा अँड महिंद्रा, हीरो मोटोकॉर्प, ओएनजीसी, लार्सन अँड टुब्रो, जेएसडब्ल्यू स्टील आणि हिंडाल्को यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले, तर सिप्ला, टीसीएस, टाटा कन्झ्युमर, नेस्ले इंडिया, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक आणि डॉक्टर रेड्डीज लॅब्स यांचे शेअर्स सर्वाधिक घसरले. 

गौतम अदानी समूहातील सर्व १० लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स वधारले आणि अदानी टोटल गॅसचे शेअर्स ५.६ टक्क्यांनी वधारले, तर एनडीटीव्हीचे समभाग सुमारे दोन टक्क्यांनी वधारले.

टॅग्स :शेअर बाजार