Join us  

Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 3:52 PM

Closing bell today: चालू आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शेअर बाजार तेजीसह बंद झाला. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार दिसून येत आहेत.

Closing bell today: चालू आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शेअर बाजार तेजीसह बंद झाला. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार दिसून येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार पुन्हा आले नाही तर नव्या सरकारला विद्यमान धोरणं कायम ठेवण्यात अडचणी येतील आणि त्यामुळे बाजाराला चढ-उतारांना सामोरं जावं लागत असल्याची भीती शेअर बाजाराला असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. बीएसई सेन्सेक्स शुक्रवारी २५३ अंकांनी वधारून ७३९१७ अंकांवर बंद झाला, त्याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६२ अंकांच्या मजबुतीने २२४६६ वर बंद झाला. 

चालू आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार तेजीसह बंद झाला. शुक्रवारी ऑटो शेअर्समध्ये मोठी वाढ झाली, तर बँकिंग आणि आयटी शेअर्समध्ये घसरण नोंदवण्यात आली. महिंद्रा आणि एचएएलच्या उत्कृष्ट तिमाही निकालांमुळे बाजारात सकारात्मक वातावरण होतं. जागतिक बाजारात आयटी आणि बँकिंग व्यवसायावर दबाव आल्यानं या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.  

कोण आहेत टॉप गेनर आणि लूझर 

शुक्रवारी महिंद्रा अँड महिंद्रा, जेएसडब्ल्यू स्टील, ग्रासिम इंडस्ट्रीज, अल्ट्राटेक सिमेंट, बीपीसीएल, कोटक बँक आणि श्रीराम फायनान्सच्या शेअर्समध्ये तेजी होती. टीसीएस, सिप्ला, एसबीआय लाइफ, एचसीएल टेक, हीरो मोटोकॉर्प, बजाज ऑटो आणि नेस्ले इंडिया या शेअर्समध्ये घसरण झाली. महिंद्रा, जेएसडब्ल्यू स्टील, भारती एअरटेल आणि हीरो मोटोकॉर्पच्या शेअर्सनं ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला. निफ्टी निर्देशांकाबद्दल बोलायचं झालं तर निफ्टी आयटी आणि निफ्टी फार्मा निर्देशांकात घसरण नोंदवण्यात आली, तर इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक ग्रीन झोनमध्ये बंद झाले.

टॅग्स :शेअर बाजार