Join us  

Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; टाटा मोटर्समध्ये बंपर तेजी, बजाज फायनान्स घसरला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2024 3:59 PM

शेअर बाजारातील कामकाज मंगळवारी घसरणीसह बंद झालं. मुंबई शेअर बाजाराचा बीएसई सेन्सेक्स 195 अंकांनी घसरून 73677 अंकांच्या पातळीवर बंद झाला.

Stock market closing bell : शेअर बाजारातील कामकाज मंगळवारी घसरणीसह बंद झालं. मुंबई शेअर बाजाराचा बीएसई सेन्सेक्स 195 अंकांनी घसरून 73677 अंकांच्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 49 अंकांनी घसरून 22356 अंकांच्या पातळीवर बंद झाला. मंगळवारी शेअर बाजाराच्या कामकाजादरम्यान बरेच चढ-उतार पाहायला मिळतात.  

मंगळवारी गौतम अदानी समूहाच्या 10 पैकी 7 कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह बंद झाले. अदानी ग्रीन, अदानी एनर्जी सोल्युशन आणि अदानी पॉवरच्या शेअरमध्ये मात्र थोडी वाढ दिसून आली. 

मंगळवारी शेअर बाजारातील घसरणीदरम्यान निफ्टी बँक, निफ्टी ऑटो आणि निफ्टी फार्मा निर्देशांकांनी वाढ दिसून आली. मंगळवारी निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांक घसरणीसह बंद झाले. टाटा मोटर्स, भारती एअरटेल, बजाज ऑटो, ओएनजीसी, एसबीआय, सन फार्मा आणि एनटीपीसी या कंपन्यांच्या शेअर्सचा टॉप गेनर्सच्या यादीत समावेश होता. 

बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, नेस्ले, एसबीआय लाइफ, इन्फोसिस, टीसीएस आणि एलटीआय माइंड ट्री या कंपन्यांचे शेअर्स मंगळवारी शेअर बाजारातील टॉप लूजर्सच्या यादीत समाविष्ट होते.

टॅग्स :शेअर बाजार