Closing Bell Today: शेअर बाजारातील व्यवसाय सोमवारी मोठ्या तेजीसह बंद झाला. बीएसई सेन्सेक्स 560 अंकांनी वधारून 73649 अंकांच्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टी 50 निर्देशांक 189 अंकांनी वधारून 22336 अंकांच्या पातळीवर बंद झाला. दिवसभर शेअर बाजाराच्या कामकाजात तेजी दिसून आली. निफ्टीचे सर्व क्षेत्रीय निर्देशांक सोमवारी तेजीसह बंद झाले. सोनं 876 रुपयांनी घसरल्यानंतर 71930 च्या पातळीवर ट्रेड करत होते.
सोमवारी दिवसभरात शेअर बाजाराच्या कामकाजात तेजी राहिली. निफ्टी ऑटोसह, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी आणि बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी मिडकॅप 100 आणि निफ्टी बँक निर्देशांक देखील एक टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.
आज टॉप गेनर्स आणि लूजर्स
शेअर बाजारातील टॉप गेनर्सबद्दल सांगायचे तर टाटा कंझ्युमर आणि बीपीसीएलचे शेअर्स तीन टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले, तर आयशर मोटर्स आणि लार्सन अँड टुब्रोचे शेअर्स सुमारे तीन टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले ॲक्सिस बँक 2.5 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. शेअर बाजाराच्या कामकाजात घसरण झालेल्या शेअर्सबद्दल बोलायचं झालं तर एनटीपीसी, एचडीएफसी बँक, जेएसडब्ल्यू स्टील, बजाज ऑटो, टाटा स्टील आणि इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
मल्टीबॅगर शेअरची स्थिती
शेअर बाजारात मल्टीबॅगर रिटर्न देणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सबद्दल बोलायचं झालं तर, लार्सन अँड टुब्रो, विप्रो, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, एचसीएल टेक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एशियन पेंट्स, कोटक महिंद्रा बँक आणि ओएनजीसी यांचे शेअर्स तेजीसह बंद झाले. एचडीएफसी बँक लिमिटेडच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. गौतम अदानी समूहाच्या 10 लिस्टेड कंपन्यांपैकी 9 कंपन्यांचे समभाग तेजीसह बंद झाले, तर ACC लिमिटेडच्या शेअर्समध्ये किंचित घसरण दिसून आली.