Stock market closing bell: शेअर बाजारातील कामकाज मंगळवारी तेजीसह बंद झालं. बीएसई सेन्सेक्स 90 अंकांनी वधारून 73738 अंकांच्या पातळीवर बंद झाला तर निफ्टी 50 निर्देशांक 32 अंकांच्या वाढीसह 22368 अंकांच्या पातळीवर बंद झाला. दिवसभर शेअर बाजाराच्या कामकाजात तेजी दिसून आली. क्षेत्रीय निर्देशांकात रिॲलिटी सर्वाधिक वाढ दिसून आली. निफ्टी फार्मा आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांक वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक वाढीसह बंद झाले.
निफ्टी मिडकॅप 100 आणि बीएसई स्मॉल कॅपमध्ये एक टक्क्याहून अधिक वाढ नोंदवली. तर निफ्टी आयटी, निफ्टी बँक, निफ्टी ऑटो आणि निफ्टी एफएमसीजी निर्देशांकही वाढीसह बंद झाले. शेअर बाजारातील टॉप गेनर्सबद्दल सांगायचं झालं तर, यामध्ये ग्रासिम इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, नेस्ले इंडिया, मारुती सुझुकी, एचसीएल टेक, टाटा मोटर्स आणि एनटीपीसी यांचे शेअर्सचा समावेश आहे. शेअर बाजारातील सर्वाधिक नुकसान झालेल्यांमध्ये सन फार्मा, बीपीसीएल, आरआयएल, महिंद्रा, हिंदाल्को, डॉ रेड्डीज आणि एचडीएफसी लाईफ यांचा समावेश आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत मंगळवारी 2,919.50 रुपयांच्या पातळीवर बंद झाली. कामकाजाच्या अखेरिस त्यात 40.20 रुपयांची घसरण नोंदवली गेली. तर L&T च्या शेअरची किंमत मंगळवारी 3,606 रुपयांच्या पातळीवर बंद झाली. ज्यामध्ये 6.70 रुपयांची घसरण दिसून आली.