Closing Bell Today: बुधवारी शेअर बाजारातील कामकाज घसरणीसह बंद झालं. बीएसई सेन्सेक्स 27 अंकांनी घसरून 73,876 अंकांच्या पातळीवर बंद झाला तर निफ्टी 50 निर्देशांक 18 अंकांनी घसरून 22434 अंकांच्या पातळीवर बंद झाला. बुधवारी दिवसभर शेअर बाजाराच्या कामकाजात चढ-उतार दिसून आले.
बुधवारी, शेअर बाजाराच्या अस्थिर कामकाजादरम्यान निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांकानं 0.5 टक्क्यांनी वाढ नोंदवली. बीएसई स्मॉल कॅप निर्देशांक 1.2 टक्क्यांनी वाढून बंद झाला. निफ्टी आयटी 0.66 टक्क्यांनी वधारला तर निफ्टी बँक देखील किरकोळ वाढीनं बंद झाला. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्समध्येही किंचित वाढ नोंदवण्यात आली. निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा आणि निफ्टी एफएमसीजी निर्देशांकात घसरण दिसून आली.
बुधवारी शेअर बाजारातील सर्वाधिक घसरण झालेल्या शेअर्सबद्दल बोलायचं झालं तर त्यात नेस्ले इंडिया लिमिटेड, बजाज ऑटो, डॉ. रेड्डीज, कोटक बँक, ब्रिटानिया, सिप्ला आणि जेएसडब्ल्यू स्टीलच्या शेअर्सचा समावेश होता. तर श्रीराम फायनान्स, एनटीपीसी, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स, टीसीएस, ॲक्सिस बँक आणि डिवीज लॅबचे शेअर्स शेअर बाजारातील टॉप गेनर्सच्या यादीत समाविष्ट होते.
हे शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर
शेअर बाजारातील चढ-उतार दरम्यान, कोचीन शिपयार्ड, पंजाब नॅशनल बँक, जेएसडब्ल्यू एनर्जी, लॉरस लॅब्स, नाल्को, अदानी पॉवर आणि लिंडे इंडिया यांचे समभाग ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले.