Lokmat Money >शेअर बाजार > Closing Bell : Sensex-Nifty चा विक्रमी उच्चांक, चार दिवसांत गुंतवणूकदारांनी कमावले ₹११ लाख कोटी

Closing Bell : Sensex-Nifty चा विक्रमी उच्चांक, चार दिवसांत गुंतवणूकदारांनी कमावले ₹११ लाख कोटी

शेअर बाजारात आज सलग चौथ्या दिवशी खरेदीचा कल दिसून आला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 04:31 PM2023-12-27T16:31:25+5:302023-12-27T16:32:24+5:30

शेअर बाजारात आज सलग चौथ्या दिवशी खरेदीचा कल दिसून आला.

Closing Bell Sensex Nifty hits record high investors earn rs 11 lakh crore in four days bse nse | Closing Bell : Sensex-Nifty चा विक्रमी उच्चांक, चार दिवसांत गुंतवणूकदारांनी कमावले ₹११ लाख कोटी

Closing Bell : Sensex-Nifty चा विक्रमी उच्चांक, चार दिवसांत गुंतवणूकदारांनी कमावले ₹११ लाख कोटी

Stock Market Closing Bell: शेअर बाजारात आज सलग चौथ्या दिवशी खरेदीचा कल दिसून आला आणि देशांतर्गत इक्विटी बेंचमार्क निर्देशांक बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी 50 नं विक्रमी उच्चांक गाठला. बाजारातील तेजीत आज गुंतवणूकदारांनी 2.39 लाख कोटी रुपयांची कमाई केली. त्याचबरोबर चार दिवसांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल 11.11 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 

दरम्यान, इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांबद्दल बोलायचं झाल्यास, आज सेन्सेक्स 0.98 टक्क्यांच्या वाढीसह 72038.43 वर बंद झाला आणि निफ्टी 1 टक्क्यांच्या वाढीसह 21654.75 वर बंद झाला. सेन्सेक्सनं पहिल्यांदाच 72 हजारांचा टप्पा ओलांडला आहे आणि निफ्टी पहिल्यांदाच 21600 च्या पुढे बंद झाला.

आज बाजाराला जवळपास प्रत्येक क्षेत्रातील शेअर्सचा सपोर्ट मिळाल्याचं दिसून आलं. एचडीएफसी बँकेचे अध्यक्ष अतनु चक्रवर्ती यांच्या नियुक्तीला पुन्हा मंजुरी देण्यात आली आहे, ज्यामुळे त्यांचे शेअर्स 1 टक्क्यांपेक्षा अधिक वधारले. हेवीवेट शेअर असल्याने निर्देशांकांना त्याचा आधार मिळाला. आज निफ्टी मीडिया आणि ऑइल अँड गॅस वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांक वाढीसह बंद झाले. मात्र, त्यातही घसरण अर्ध्या टक्क्यांहून कमी होती. निफ्टी बँक आज 1.20 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.

गुंतवणूकदारांनी कमावले 2.36 लाख कोटी
बाजारातील तेजीमुळे आज गुंतवणूकदारांनी मोठा नफा कमावला. 26 डिसेंबर 2023 रोजी, बीएसईवर लिस्टेड सर्व शेअर्सचं एकूण मार्केट कॅप 358.92 लाख कोटी रुपये होतं. आज 27 डिसेंबर 2023 रोजी ते 361.31 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. याचा अर्थ आज गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2.39 लाख कोटी रुपयांची वाढ झाली. तर 20 डिसेंबर रोजी मार्केट कॅपचा हा आकडा 350.20 लाख कोटी रुपये होता, म्हणजेच चार दिवसांत गुंतवणूकदारांनी बाजारातील तेजीत 11.11 लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे.

28 शेअर्स ग्रीन झोनमध्ये
सेन्सेक्सवर लिस्ट असलेल्या 30 शेअर्सपैकी 28 आज ग्रीन झोनमध्ये बंद झाले. अल्ट्राटेक सिमेंट, जेएसडब्ल्यू स्टील आणि टाटा मोटर्समध्ये आज सर्वाधिक वाढ झाली. दुसरीकडे, आज एनटीपीसी आणि टेक महिंद्रामध्ये सर्वाधिक घसरण पाहायला मिळाली. 

Web Title: Closing Bell Sensex Nifty hits record high investors earn rs 11 lakh crore in four days bse nse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.