देशांतर्गत शेअर बाजार बुधवारी विक्रमी उच्चांकी पातळीवर बंद झाला. बीएसई सेन्सेक्स 499.39 अंकांच्या म्हणजेच 0.79 टक्क्यांच्या वाढीसह 63,915.42 अंकांवर बंद झाला. त्याचप्रमाणे, निफ्टी 164.75 अंकांच्या किंवा 0.88 टक्क्यांच्या वाढीसह 18,982.15 अंकांवर बंद झाला. आज दिवसभराच्या व्यवहारादरम्यान सेन्सेक्सनं प्रथमच 64000 अंकांची पातळी ओलांडली होती. त्याचवेळी निफ्टीनंही प्रथमच 19000 अंकांची पातळी ओलांडली. अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स निफ्टीमध्ये सर्वाधिक 5.43 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.
सर्व सेक्टरल निर्देशांक वाढीसह बंद झाले. मेटल, पॉवर, फार्मा आणि कॅपिटल गुड्स प्रत्येकी एका टक्क्याच्या वाढीसह बंद झाले. तर दुसरीकडे बीएसई मिडकॅप निर्देशांक 0.7 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. तर स्मॉलकॅप निर्देशांक फ्लॅट क्लोझ झाला.
या शेअर्समध्ये वाढ
बीएसई सेन्सेक्सवर टाटा मोटर्सचा शेअर सर्वाधिक 2.38 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. याशिवाय सन फार्मा, टायटन, लार्सन अँड टुब्रो, इंडसइंड बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एनटीपीसी, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स, इन्फोसिस आणि एचडीएफसी बँक एका टक्क्यांपेक्षा अधिक वाढीसह बंद झाले.
याशिवाय आयटीसी, भारती एअरटेल, एशियन पेंट्स, टाटा स्टील, एसबीआय, एचडीएफसी, टीसीएस, अॅक्सिस बँक आणि हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडचे शेअर्सही वाढीसह बंद झाले.
या शेअर्समध्ये घसरण
टेक महिंद्राचा समभाग सेन्सेक्सवर सर्वाधिक 0.95 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. त्याचप्रमाणे महिंद्रा अँड महिंद्रा, कोटक महिंद्रा बँक, बजाज फिनसर्व्ह आणि एचसीएल टेक यांचे शेअर्स सर्वाधिक घसरणीसह बंद झाले.