Lokmat Money >शेअर बाजार > Closing Bell : सेन्सेक्स ९४ अंकांनी वधारला, निफ्टीत किरकोळ घसरण; TCS वधारला

Closing Bell : सेन्सेक्स ९४ अंकांनी वधारला, निफ्टीत किरकोळ घसरण; TCS वधारला

बीएसई मिडकॅप इंडेक्समध्ये तीन टक्क्यांची घसरण दिसून आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 04:20 PM2023-09-12T16:20:08+5:302023-09-12T16:20:43+5:30

बीएसई मिडकॅप इंडेक्समध्ये तीन टक्क्यांची घसरण दिसून आली.

Closing Bell Sensex up 94 points Nifty marginally falls TCS increased profit booking today | Closing Bell : सेन्सेक्स ९४ अंकांनी वधारला, निफ्टीत किरकोळ घसरण; TCS वधारला

Closing Bell : सेन्सेक्स ९४ अंकांनी वधारला, निफ्टीत किरकोळ घसरण; TCS वधारला

प्रॉफिट बुकींगच्या दबावामुळे देशांतर्गत शेअर बाजार जोरदार सुरुवात करूनही सपाट बंद झाले. बीएसई सेन्सेक्स 94.05 अंकांच्या किंवा 0.14 टक्क्यांच्या वाढीसह 67,221.13 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. त्याच वेळी, एनएसई निफ्टी 3.15 अंकांच्या किंवा 0.02 टक्क्यांच्या घसरणीसह 19,993.20 अंकांच्या पातळीवर बंद झाला. टीसीएसच्या शेअर्समध्ये तीन टक्क्यांची वाढ दिसून आली. त्याचवेळी एनटीपीसीच्या शेअरमध्ये तीन टक्क्यांची घसरण दिसून आली.

माहिती तंत्रज्ञान वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरणीसह बंद झाले. त्याच वेळी, ऑटो, कॅपिटल गुड्स, पॉवर, ऑइल अँड गॅस, मेटल आणि रिअल इस्टेट निर्देशांकात 1-3 टक्क्यांची घसरण दिसून आली. बीएसई मिडकॅप निर्देशांकात तीन टक्क्यांची घसरण झाली. त्याचवेळी स्मॉलकॅप निर्देशांकात चार टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली.

या शेअर्समध्ये वाढ
बीएसई सेन्सेक्सवर टीसीएसच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 2.91 टक्क्यांची वाढ झाली. त्याचप्रमाणे लार्सन अँड टुब्रो, इन्फोसिस, अल्ट्राटेक सिमेंट, आयसीआयसीआय बँक, नेस्ले इंडिया यांचे शेअर्स प्रत्येकी एक टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले. याशिवाय आयटीसी, सन फार्मा, एचडीएफसी आणि कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्सही वाढीसह बंद झाले. 

या शेअर्समध्ये घसरण
पॉवर ग्रिडच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 3.48 टक्क्यांची घसरण झाली. त्याचप्रमाणे एनटीपीसी, टाटा मोटर्स, टाटा स्टील, महिंद्रा अँड महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड, इंडसइंड बँकेच्या एक टक्क्याहून अधिक घसरण नोंदवण्यात आली. याशिवाय टायटन, एसबीआय, बजाज फिनसर्व्ह, टेक महिंद्रा आणि मारुती यांचे शेअर्सही घसरणीसह बंद झाले.

Web Title: Closing Bell Sensex up 94 points Nifty marginally falls TCS increased profit booking today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.