Closing Bell Today:शेअर बाजारातगुंतवणूक करणाऱ्यांसाठी गुरुवारचा दिवस(दि.9) अतिशय वाईट ठरला. गुरुवारी BSE सेन्सेक्स 1062 अंकांनी घसरुन आणि 72404 च्या पातळीवर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा NIFTI 345 अंकांनी घसरुन 21957 च्या पातळीवर बंद झाला. यादरम्यान हिरो, टाटा, महिंद्रा आणि एसबीआयचे शेअर्स वधारले, तर एल&टी, बीपीसीएल, एशियन पेंट्स आणि कोल इंडियाला फटका बसला.
गुंतवणूकदारांना सात लाख कोटींचा फटका
शेअर बाजारातील या त्सुनामीमुळे आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे सात लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 393.68 लाख कोटी रुपयांवर आले, जे गेल्या ट्रेडिंग सत्रात 400.69 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच, आजच्या ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटी रुपयांचा फटका बसला. आजच्या व्यवहारात एकूण 3943 शेअर्सचे व्यवहार झाले, ज्यामध्ये 929 शेअर्स वाढीसह बंद झाले, तर 2902 शेअर्स घसरले.
कोणते शेअर्स घसरले...?
गुरुवारी BSE मधील टॉप 30 पैकी 25 शेअर्समध्ये मोठी घसरण झाली, केवळ 5 शेअर्स वाढले. टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये सुमारे 2 टक्के, महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअरमध्ये 1.48 टक्के, एसबीआयच्या शेअरमध्ये 1.27 टक्के आणि इन्फोसिस, एचसीएलच्या शेअरमध्ये किंचित वाढ झाली आहे. तोट्यात असलेल्या 25 शेअर्सपैकी L&T च्या शेअर्समध्ये 5.56 टक्क्यांनी सर्वात मोठी घसरण झाली. यानंतर एशियन पेंट्स, जेएसडब्ल्यू स्टील, आयटीसी, बजाज फायनान्स आणि इंडसइंड बँकेचे शेअर 5 टक्क्यांपर्यंत घसरले आहेत.
या 6 शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण
L&T चे शेअर आज सुमारे 6 टक्क्यांनी घसरून 3275 रुपयांवर आले. याशिवाय पॉवर फायनान्सचा समभाग 5 टक्क्यांनी, बीपीसीएलचा 5 टक्क्यांनी, पिरामल एंटरप्रायझेसचा शेअर 9 टक्क्यांनी, एनएचपीसीचा 5.26 टक्के आणि मणप्पुरम फायनान्सचा 8 टक्क्यांनी घसरला आहे. आजच्या व्यवहारात आयटी, फार्मा, मेटल ऑइल अँड गॅस, कंझ्युमर ड्युरेबल्स आणि हेल्थकेअर क्षेत्रातील शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर , ऑटो आणि बँकिंग शेअर्समध्ये चांगली वाढ नोंदवली गेली. या
(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)