Lokmat Money >शेअर बाजार > Closing Bell: शेअर बाजारानं पकडला 'बुलेट' स्पीड, ८०३ अंकांच्या तेजीसह बंद झाला Sensex

Closing Bell: शेअर बाजारानं पकडला 'बुलेट' स्पीड, ८०३ अंकांच्या तेजीसह बंद झाला Sensex

Closing Bell Today: देशांतर्गत शेअर बाजारातील तेजी कायम आहे. विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांची गुंतवणूक कायम ठेवणं आणि इतर कारणांमुळे शेअर बाजारात स्थिर तेजी पाहायला मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 04:36 PM2023-06-30T16:36:24+5:302023-06-30T16:36:45+5:30

Closing Bell Today: देशांतर्गत शेअर बाजारातील तेजी कायम आहे. विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांची गुंतवणूक कायम ठेवणं आणि इतर कारणांमुळे शेअर बाजारात स्थिर तेजी पाहायला मिळत आहे.

Closing Bell Stock market sensex up by 803 points crossess 64000 mark nifty also gains investment stocks up | Closing Bell: शेअर बाजारानं पकडला 'बुलेट' स्पीड, ८०३ अंकांच्या तेजीसह बंद झाला Sensex

Closing Bell: शेअर बाजारानं पकडला 'बुलेट' स्पीड, ८०३ अंकांच्या तेजीसह बंद झाला Sensex

Closing Bell Today: शुक्रवारी शेअर बाजारातील तेजी कायम राहिल्याचं दिसून आलं आणि बेंचमार्क निर्देशांक 1 टक्क्यांहून अधिक उसळीसह बंद झाले. BSE सेन्सेक्स 803.14 अंकांच्या म्हणजेच 1.26 टक्क्यांच्या वाढीसह 64,718.56 अंकांच्या पातळीवर बंद झाला. त्याचप्रमाणे निफ्टी 216.95 अंकांच्या म्हणजेच 1.14 टक्क्यांच्या वाढीसह 19,189.05 अंकांच्या पातळीवर बंद झाला. जेके टायर्सचा शेअर आज 14 टक्क्यांच्या उसळीसह बंद झाला. त्याच वेळी, बायोकॉनच्या शेअरमध्ये 8 टक्क्यांची वाढ दिसून आली.

सर्व क्षेत्रीय निर्देशांक वाढीसह बंद झाले. आयटी निर्देशांक 2.5 टक्के आणि पीएसयू बँक निर्देशांक दोन टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. त्याचप्रमाणे ऑटो आणि कॅपिटल गुड्स निर्देशांकही 2-2 टक्क्यांच्या उसळीसह बंद झाले. बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक 0.5-0.5 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.

या शेअर्समध्ये तेजी
सेन्सेक्सवर महिंद्रा आणि महिंद्राचा शेअर 4.14 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. त्याचप्रमाणे इन्फोसिस, इंडसइंड बँक, सन फार्मा, टीसीएस, मारुती, लार्सन अँड टुब्रो, पॉवरग्रीड, टेक महिंद्रा आणि विप्रोचे शेअर तेजीसह बंद झाले.

याशिवाय एचडीएफसी बँक, एचडीएफसी, टाटा मोटर्स, एचसीएल टेक, बजाज फायनान्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, टायटन, अॅक्सिस बँक, नेस्ले इंडिया, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, आयटीसी, एसबीआय, बजाज फिनसर्व्ह आणि एशियन पेंट्सचे शेअरही वाढीसह बंद झाले.

या शेअर्समध्ये घसरण
आयसीआयसीआय बँक आणि एनटीपीसीच्या शेअर्समध्ये कामकाजादरम्यान घसरण दिसून आली.

Web Title: Closing Bell Stock market sensex up by 803 points crossess 64000 mark nifty also gains investment stocks up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.