Join us  

Closing Bell: शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स ५०५ अंकांनी आपटला; निफ्टीही १९३५० च्या खाली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2023 5:09 PM

आठवड्याच्या कामकाजाच्या अखेरच्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली.

आज देशांतर्गत शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाले. कामकाजादरम्यान बीएसई सेन्सेक्स 505.19 अंक किंवा 0.77 टक्क्यांनी घसरून 65,280.45 वर बंद झाला. त्याचप्रमाणे, NSE निफ्टी 187.40 अंकांच्या किंवा 0.96 टक्क्यांच्या घसरणीसह 19,309.90 वर बंद झाला. ZEEL चे शेअर्स आज 9 टक्क्यांच्या उसळीसह बंद झाले. निफ्टीमध्ये अदानी पोर्ट्सच्या शेअरमध्ये सर्वातधिक तीन टक्क्यांची घसरण झाली.

पॉवरग्रीडच्या शेअरमध्ये सेन्सेक्सवर सर्वाधिक घसरण दिसून आली. याशिवाय इंडसइंड बँक, टेक महिंद्रा, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, इंडसइंड बँक, टेक महिंद्रा, एनटीपीसी, बजाज फायनान्स, एचसीएल टेक, आयसीआयसीआय बँक, लार्सन अँड टुब्रो, एशियन पेंट्स, कोटक महिंद्रा बँक, इन्फोसिस, एचडीएफसी आणि नेस्ले इंडियाच्या शेअर्समध्ये एक टक्क्यापेक्षा अधिक घसरण दिसून आली.

याशिवाय टाटा स्टील, आयटीसी, एचडीएफसी बँक, अल्ट्राटेक सिमेंट, सन फार्मा, बजाज फिनसर्व्ह, अॅक्सिस बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्येही घसरण दिसून आली.

या शेअर्समध्ये तेजीसेन्सेक्सवरील टाटा मोटर्सचा शेअर आज सर्वाधिक 2.94 टक्क्यांच्या उसळीसह बंद झाला. त्याचप्रमाणे टायटनमध्ये 1.06 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रामध्ये 0.98 टक्के आणि एसबीआयमध्ये 0.24 टक्के वाढ नोंदवण्यात आली.

 

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक