बुधवारी शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली. कामकाजाच्या अखेरीस सेन्सेक्स ७४२.०६ अकांनी म्हणजेच १.१४ टक्क्यांच्या वाढीसह ६५,६७५.९३ अंकांवर बंद झाला. तर निफ्टी २३१.९० अकांच्या म्हणजेच १.१९ टक्क्यांच्या वाढीसह १९६७५ अंकांवर बंद झाला. सर्व क्षेत्रीय निर्देशांक वाढीसह बंद झाले.
कॅपिटल गुड्स, ऑटो, मेटल आयटी, ऑईल अँड गॅस आणि रियल्टी इंडेक्स १ ते ३ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. तर बीएसईचा मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक १ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.
बुधवारी सेन्सेक्स आणि निफ्टीतील बंपर तेजीमुळे गुंतवणूकदारांना ३ लाख कोटी रुपयांचा फायदा झाला. जगभरातील शेअर बाजारातील तेजीमुळे भारतीय शेअर बाजारातही उत्साह दिसून आला. दरम्यान, गौतम अदानींच्या लिस्टेड कंपन्यांपैकी ५ कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर अंबुजा सीमेंट, अदानी पॉवर आणि अदानी टोटल गॅसच्या शेअरमध्ये किरकोळ घसरण दिसून आली.
कोणते शेअर्स वधारले, घसरले
तर दुसरीकडे मल्टी बॅगर रिटर्न देणाऱ्या शेअर्समध्ये टाटा मोटर्स, कामधेनू लिमिटेड, स्टोव्ह क्राफ्ट, ओम इन्फ्रा, गती, युनीपार्ट्स, एक्साईड इंडस्ट्रीज, महिंद्रा या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर जिओ फायनान्शिअल, पटेल इंजिनिअरिंग आणि देवयानी इंटरनॅशनलच्या शेअर्समध्ये घसरण झाली.
Closing Bell: शेअर बाजार सुस्साट... सेन्सेक्स ७४२ अंकांनी वधारला, निफ्टी १९७०० च्या जवळ बंद
बुधवारी सेन्सेक्स आणि निफ्टीतील बंपर तेजीमुळे गुंतवणूकदारांना ३ लाख कोटी रुपयांचा फायदा झाला.
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 04:05 PM2023-11-15T16:05:58+5:302023-11-15T16:06:40+5:30