Join us

Closing Bell : शेअर बाजारात जोरदार तेजी, IT शेअर्समध्ये मोठी खरेदी; टेक महिंद्रा, विप्रो टॉप गेनर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2024 3:55 PM

शेअर बाजारात सोमवारी पुन्हा एकदा वाढ झाली आणि निफ्टी १३१ अंकांच्या वाढीसह २४१४२ च्या पातळीवर बंद झाला. सेन्सेक्समध्येही चांगली वाढ दिसून आली.

शेअर बाजारात सोमवारी पुन्हा एकदा वाढ झाली आणि निफ्टी १३१ अंकांच्या वाढीसह २४१४२ च्या पातळीवर बंद झाला. सेन्सेक्समध्येही चांगली वाढ दिसून आली आणि तो ४४३ अंकांनी वधारून ७९४७६ च्या पातळीवर बंद झाला. शुक्रवारच्या विश्रांतीनंतर सोमवारी बाजारात पुन्हा एकदा तेजी दिसून आल्यानं गुंतवणूकदारांचा उत्साह कायम राहिला.

बाजाराच्या या तेजीमध्ये आयटी क्षेत्राचा मोठा वाटा होता, ज्यात जोरदार खरेदी दिसून आली. ऑटो सेक्टर, एफएमसीजी सेक्टरमध्येही तेजी आली, तर पीएसयू बँका आणि एनर्जी सेक्टरमध्ये किरकोळ विक्री झाली.

आज सकाळी बाजारातील व्यवहार फ्लॅट सुरू झाले आणि नंतर त्यात घसरण झाली. खालच्या पातळीचा सपोर्ट घेत निफ्टीनं सुरुवातीच्या मिनिटातच २४००० च्या वर ट्रेडिंग सुरू केलं. दरम्यान, आयटी क्षेत्रात मोठी तेजी दिसून आली आणि यात सर्वाधिक वाटा विप्रो आणि टेक महिंद्राचा होता.

बँकिंग क्षेत्राच्या शेअर्समध्येही सुरुवातीला विक्री आणि नंतर खरेदी दिसून आली. दिवसअखेर एचडीएफसी बँक १.२० टक्क्यांनी वधारुन १७०० रुपयांच्या पातळीवर बंद झाला. एचडीएफसी बँक लिमिटेडच्या तेजीमुळे निफ्टी आणि बँक निफ्टी चांगल्या अंकांवर बंद झाले.

टॉप गेनर्स

सोमवारी निफ्टी ५० टॉप गेनर्सच्या यादीत आयटी शेअर्सचा दबदबा होता, टेक महिंद्रा २.९२ टक्क्यांनी, विप्रो २.४० टक्क्यांनी वधारले. ग्रासिम इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स आणि अल्ट्रा टेक सिमेंटमध्ये २-२ टक्क्यांची वाढ दिसून आली.

टॅग्स :शेअर बाजार