Join us  

Closing Bell : सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार आपटला, गुंतवणूकदारांचे २.५ लाख कोटी बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2023 4:23 PM

भारतीय शेअर बाजार बुधवार, 4 ऑक्टोबर रोजी सलग दुसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाले.

भारतीय शेअर बाजार बुधवार, 4 ऑक्टोबर रोजी सलग दुसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स 286 अंकांनी घसरला, तर निफ्टी 19,400 वर घसरला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही मोठी घसरण झाली. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे सुमारे अडीच लाख कोटी रुपये बुडाले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही आयटी वगळता सर्व शेअर निर्देशांक घसरणीसह बंद झाले.कामकाजाच्या अखेरच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स 286.06 अंकांनी किंवा 0.44 टक्क्यांनी घसरून 65,226.04 वर बंद झाला. तर एनएसईचा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 79.65 अंक किंवा 0.41 टक्क्यांच्या घसरणीसह 19,449.10 वर बंद झाला.2.5 लाख कोटी बुडालेबीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 4 ऑक्टोबर रोजी 316.72 लाख कोटी रुपयांवर घसरले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे मंगळवार 3 ऑक्टोबर रोजी 319.21 लाख कोटी रुपये होते. अशाप्रकारे, बीएसई मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 2.49 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 2.49 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.हे शेअर्स वधारलेसेन्सेक्समधील 30 पैकी केवळ 9 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्येही नेस्ले इंडियाच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 2.79 टक्क्यांची वाढ झाली आहे. यानंतर हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL), एचडीएफसी बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि इन्फोसिसचे शेअर्स आज वधारले.या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरणतर सेन्सेक्सचे उर्वरित 21 शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. यापैकी अॅक्सिस बँकेचे शेअर्स 4.38 टक्क्यांनी घसरले. याशिवाय स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), एनटीपीसी, इंडसइंड बँक आणि अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर्समध्ये 2.12 ते 2.82 टक्क्यांची घसरण दिसून आली.

टॅग्स :शेअर बाजार