Closing Bell Today: शेअर बाजारातीलगुंतवणूकदारांसाठी गुरुवारचा दिवस(दि.23) अतिशय चांगला ठरला. BSE सेन्सेक्स 1197 ने वाढून 75418 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 370 अंकांच्या वाढीसह 22968 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टीच्या बंपर वाढीमुळे शेअर बाजारातील लिस्टेड कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 6 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
मार्केट कॅप 420 लाख कोटी रुपयांच्या पुढे
शेअर बाजारातील या ऐतिहासिक तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली. बीएसईवर लिस्टेड शेअर्सचे एकूण बाजार मूल्य 420.09 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे गेल्या ट्रेडिंग सत्रात 415.94 लाख कोटी रुपयांवर होते. म्हणजेच, आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 4.15 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
शेअर बाजारात वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे बँकिंग शेअर्समधील खरेदी. सरकारी आणि खासगी बँकांच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली. निफ्टी बँक निर्देशांक 986 अंकांच्या किंवा 2.06 टक्क्यांच्या वाढीसह 48,768 अंकांवर बंद झाला. निफ्टी ऑटोमध्ये 525 अंकांची तर निफ्टी आयटीमध्ये 429 अंकांची उसळी दिसून आली.
सेन्सेक्समधील 30 पैकी 27 शेअर्स वाढीसह अन् 3 तोट्यासह बंद झाले. महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्सने सेन्सेक्स-निफ्टीला विक्रमी पातळी गाठण्यास योगदान दिले. हे शेअर्स 3.51 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. याशिवाय एलअँडटी 3.38 टक्के, ॲक्सिस बँक 3.30 टक्के, मारुती सुझुकी 2.82 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 2.75 टक्के, इंडसइंड बँक 2.99 टक्के, एचडीएफसी बँक 2.22 टक्के, भारती एअरटेल 2.04 टक्के वाढीसह बंद झाले. घसरणाऱ्या शेअर्समध्ये सन फार्मा, पावर ग्रिड, हिंडालको, कोल इंडिया, एनटीपीसी आणि टाटा कंज्यूमरचे शेअर्स सामील आहेत.
(टीप- शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी मार्केट तज्ञांचा सल्ला घ्या.)