गेल्या दोन सत्रांपासून सुरू असलेला घसरणीचा ट्रेंड सोमवारी अखेर थांबला. आठवड्याच्या पहिल्या दिवशी बीएसई सेन्सेक्स 110.09 अंकांनी म्हणजेच 0.17 टक्क्यांनी वाढून 64,996.60 अंकांवर बंद झाला. त्याचप्रमाणे, एनएसई निफ्टी 40.25 अंकांच्या किंवा 0.21 टक्क्यांच्या वाढीसह 19,306.05 अंकांच्या पातळीवर बंद झाला. पॉवरग्रीडचे शेअर्स निफ्टीमध्ये सर्वाधिक 2.77 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले आणि लार्सन अँड टुब्रोचे शेअर्स 2.11 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.
एफएमजीसी आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक वाढीसह बंद झाले. रिअल्टी आणि कॅपिटल गुड्स इंडेक्समध्ये 1-1 टक्क्यांची उसळी दिसून आली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही 0.5-0.5 टक्क्यांनी वधारले.
या शेअर्समध्ये वाढ
लार्सन अँड टुब्रोचा (L&T) शेअर सेन्सेक्समध्ये सर्वाधिक 2.09 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. त्याचप्रमाणे महिंद्रा अँड महिंद्रा, एचडीएफसी बँक, सन फार्मा, मारुती, कोटक महिंद्रा बँक, टाटा स्टील, इंडसइंड बँक, अॅक्सिस बँक, एसबीआय, अल्ट्राटेक सिमेंट आणि एनटीपीसी यांचे शेअर्सही वाढीसह बंद झाले.
या शेअर्समध्ये घसरण
सेन्सेक्सवरील रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर 1.11 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले. याशिवाय नेस्ले इंडिया, एचसीएल टेक, टायटन, आयटीसी, टाटा मोटर्स, भारती एअरटेल, विप्रो, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, टेक महिंद्रा, इन्फोसिस आणि बजाज फिनसर्व्ह यांचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.