Lokmat Money >शेअर बाजार > Closing Bell Today: निफ्टीनं रचला इतिहास, गाठली २० हजारांची पातळी; Sensex ५२८ अंकांनी वधारला

Closing Bell Today: निफ्टीनं रचला इतिहास, गाठली २० हजारांची पातळी; Sensex ५२८ अंकांनी वधारला

एनएसईच्या बेंचमार्क निर्देशांक निफ्टीने सोमवारी नवा इतिहास रचला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 04:19 PM2023-09-11T16:19:35+5:302023-09-11T16:20:05+5:30

एनएसईच्या बेंचमार्क निर्देशांक निफ्टीने सोमवारी नवा इतिहास रचला.

Closing Bell Today Nifty Creates History Reaches 20000 Level Sensex rose by 528 points | Closing Bell Today: निफ्टीनं रचला इतिहास, गाठली २० हजारांची पातळी; Sensex ५२८ अंकांनी वधारला

Closing Bell Today: निफ्टीनं रचला इतिहास, गाठली २० हजारांची पातळी; Sensex ५२८ अंकांनी वधारला

एनएसईच्या बेंचमार्क निर्देशांक निफ्टीने सोमवारी नवा इतिहास रचला. दिवसाच्या व्यवहाराच्या अगदी शेवटच्या काही मिनिटांत या बेंचमार्क निर्देशांकानं 20,000 अंकांची पातळी ओलांडली. मात्र, कामकाज बंद झालं तेव्हा तो 20 हजार अंकांच्या किंचित खाली बंद झाला. अशा प्रकारे, 50 शेअर्सवर आधारित या बेंचमार्क निर्देशांकानं प्रथमच 20,000 अंकांच्या महत्त्वाच्या पातळीला स्पर्श केला.

त्याचप्रमाणे बीएसई सेन्सेक्समध्येही 500 हून अधिक अंकांची वाढ दिसून आली. त्यामुळे बीएसई सेन्सेक्स 528.17 अंकांच्या किंवा 0.79 टक्क्यांच्या वाढीसह 67,127.08 अंकांच्या पातळीवर बंद झाला. एनएसई निफ्टी 176.40 अंकांच्या किंवा 0.89 टक्क्यांच्या वाढीसह 19,996.35 अंकांच्या पातळीवर बंद झाला. कामकाजादरम्यान निफ्टीनं 20,008.15 अंकांच्या आजवरच्या उच्चांकी स्तराला स्पर्श केला. दरम्यान, गुंतवणूकदारांनी एका दिवसात ३ लाख कोटी रुपये कमावले.

हे शेअर्स वधारले
बीएसई सेन्सेक्सवर अॅक्सिस बँक, पॉवर ग्रिड आणि मारुतीचे शेअर्स सुमारे दोन टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. याशिवाय एसबीआय, टाटा मोटर्स, आयटीसी, नेस्ले इंडिया, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, टीसीएस आणि एनटीपीसी यांचे शेअर्सही वाढीसह बंद झाले. याशिवाय रिलायन्स इंडस्ट्रीज, जेएसडब्ल्यू स्टील, कोटक महिंद्रा बँक, एचयूएलचे शेअर्सही वधारले.

यात घसरण
तर दुसरीकडे बजाज फायनान्स, लार्सन अँड टुब्रो या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

Web Title: Closing Bell Today Nifty Creates History Reaches 20000 Level Sensex rose by 528 points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.