Lokmat Money >शेअर बाजार > Closing Bell Today: सेन्सेक्स २१३ अंकांच्या उसळीसह बंद, अदानी एन्टरप्रायझेस, जिओ फायनान्शिअल आपटला

Closing Bell Today: सेन्सेक्स २१३ अंकांच्या उसळीसह बंद, अदानी एन्टरप्रायझेस, जिओ फायनान्शिअल आपटला

मोठ्या चढ उतारानंतर बुधवारी देशांतर्गत शेअर बाजार तेजीसह बंद झाले. बी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 04:33 PM2023-08-23T16:33:52+5:302023-08-23T16:34:01+5:30

मोठ्या चढ उतारानंतर बुधवारी देशांतर्गत शेअर बाजार तेजीसह बंद झाले. बी

Closing Bell Today Sensex closes higher for third day in a row Adani Enterprises Jio Financial huge loss | Closing Bell Today: सेन्सेक्स २१३ अंकांच्या उसळीसह बंद, अदानी एन्टरप्रायझेस, जिओ फायनान्शिअल आपटला

Closing Bell Today: सेन्सेक्स २१३ अंकांच्या उसळीसह बंद, अदानी एन्टरप्रायझेस, जिओ फायनान्शिअल आपटला

मोठ्या चढ उतारानंतर बुधवारी देशांतर्गत शेअर बाजार तेजीसह बंद झाले. बीएसई सेन्सेक्स 213.27 अंकांच्या म्हणजेच 0.33 टक्क्यांच्या वाढीसह 65,433.30 अंकांच्या पातळीवर बंद झाला. त्याचप्रमाणे एनएसई निफ्टी 47.55 अंकांच्या किंवा 0.25 टक्क्यांच्या वाढीसह 19,444 अंकांच्या पातळीवर बंद झाला. निफ्टीमध्ये अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरमध्ये सर्वाधिक सहा टक्क्यांची घसरण झाली. त्याच वेळी, हिंदाल्को आणि अॅक्सिस बँकेचे शेअर्स 2 टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले.

आयसीआयसीआय बँक, एसबीआय, लार्सन अँड टुब्रो, मारुती आणि टाटा स्टीलचे शेअर्स सेन्सेक्समध्ये एका टक्क्याहून अधिक वाढीसह बंद झाले. याशिवाय कोटक महिंद्रा बँक, बजाज फायनान्स, नेस्ले इंडिया, पॉवरग्रीड, एचडीएफसी बँक, टीसीएस, इन्फोसिस आणि बजाज फिनसर्व्हच्या शेअर्समध्येही तेजी दिसून आली.

हे शेअर्स घसरले
सेन्सेक्सवरील जिओ फायनान्शिअलचा शेअर सर्वाधिक 5 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. त्याचप्रमाणे सन फार्मा आणि भारती एअरटेलचे शेअरही प्रत्येकी एक टक्‍क्‍यांहून अधिक घसरून बंद झाले. याशिवाय टाटा मोटर्स, टेक महिंद्रा, आयटीसी, अल्ट्राटेक सिमेंट, महिंद्रा आणि महिंद्रा, विप्रो, एशियन पेंट्स, टायटन आणि इंडसइंड बँक यांचे शेअर्सही घसरले.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती
क्षेत्रीय निर्देशांकात आज संमिश्र कल दिसून आला. बँक, मेटल आणि कॅपिटल गुड्समध्ये 0.5-1 टक्क्यांची उसळी दिसून आली. त्याच वेळी, पॉवर, एफएमसीजी, ऑईल अँड गॅसमध्ये 0.3-1 टक्क्यांची घसरण दिसून आली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप 0.5-0.5 टक्क्यांनी वधारले.

Web Title: Closing Bell Today Sensex closes higher for third day in a row Adani Enterprises Jio Financial huge loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.