Closing Bell Today: देशांतर्गत शेअर बाजारातील तेजी मंगळवारीही कायम राहिली. बीएसई सेन्सेक्स 205.21 अंकांच्या म्हणजेच 0.31 टक्क्यांच्या वाढीसह 66,795.14 अंकांच्या पातळीवर बंद झाला. त्याचप्रमाणे, एनएसई निफ्टी 37.80 अंकांच्या किंवा 0.19 टक्क्यांच्या वाढीसह 19,749.25 अंकांच्या पातळीवर बंद झाला. इन्फोसिसचा शेअर निफ्टीमध्ये सर्वाधिक 3.73 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. त्याचप्रमाणे एशियन पेंट्सचा शेअर 1.56 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.
सेन्सेक्सवर इन्फोसिसचा शेअर सर्वाधिक 3.73 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. यासह एशियन पेंट्स, एचसीएल टेक, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, एनटीपीसी, विप्रो, टेक महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, लार्सन अँड टुब्रो, आयटीसी आणि टीसीएसचा शेअर वाढीसह बंद झाला.
या शेअर्समध्ये घसरण
सेन्सेक्सवर एसबीआयच्या शेअरमध्ये सर्वाधिक 1.45 टक्क्यांची घसरण झाली. याशिवाय टायटन, बजाज फायनान्स, टाटा मोटर्स, सन फार्मा, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, नेस्ले इंडिया, कोटक महिंद्रा बँक आणि मारुती यांचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.
सेक्टरल इंडेक्सची स्थिती
सेक्टरल इंडेक्सबद्दल बोलायचं झालं तर मेटल आणि रिअल इस्टेट निर्देशांकात एक टक्क्याची घसरण झाली. त्याचवेळी पॉवर इंडेक्समध्ये 0.6 टक्क्यांची आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये एक टक्क्यांची वाढ दिसून आली.