Join us  

Closing Bell Today: सेन्सेक्स ३२० अंकांच्या तेजीसह बंद, ऑटो सेक्टर चमकले; 'या' शेअर्समध्ये तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 4:14 PM

देशांतर्गत शेअर बाजारातील वाढीचं सत्र शुक्रवारीही कायम राहिलं आणि सेन्सेक्स आणि निफ्टी वाढून बंद झाले.

देशांतर्गत शेअर बाजारातील वाढीचं सत्र शुक्रवारीही कायम राहिलं आणि सेन्सेक्स आणि निफ्टी वाढून बंद झाले. बीएसई सेन्सेक्स 319.63 अंकांच्या किंवा 0.47 टक्क्यांच्या वाढीसह 67,838.63 अंकांच्या पातळीवर बंद झाला. त्याचप्रमाणे एनएसई निफ्टी 89.25 अंकांच्या किंवा 0.44 टक्क्यांच्या वाढीसह 20,192.35 अंकांच्या पातळीवर बंद झाला. आज बजाज ऑटोच्या शेअर्समध्ये सहा टक्क्यांची वाढ दिसून आली. त्याच वेळी टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रामध्ये दोन टक्क्यांपर्यंत वाढ दिसून आली.

विविध क्षेत्रात आज संमिश्र वातावरण दिसून आले. एफएमसीजी, ऑइल अँड गॅस, पॉवर आणि रियल्टी निर्देशांकात 0.2-1 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. त्याच वेळी ऑटो, बँक, फार्मा आणि आयटी निर्देशांकात 0.3-1 टक्क्यांची वाढ दिसून आली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही वाढीसह बंद झाले.

या शेअर्समध्ये वाढबीएसई सेन्सेक्सवर महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअरमध्ये 2.17 टक्क्यांची नोंदवण्यात आली. त्याचप्रमाणे भारती एअरटेल, टाटा मोटर्स, टेक महिंद्रा आणि एचसीएल टेकमध्ये प्रत्येकी एका टक्क्याची वाढ झाली. याशिवाय टीसीएस, एचडीएफसी बँक, विप्रो, सन फार्मा, मारुती, आयसीआयसीआय बँक, अल्ट्राटेक सिमेंट, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील आणि एसबीआय यांचे शेअर्स वाढीसह बंद झाले.

हे शेअर्स घसरलेसेन्सेक्सवर एशियन पेंट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, बजाज फिनसर्व्ह, एनटीपीसी, आयटीसी, इंडसइंड बँक, कोटक महिंद्रा बँक, टायटन आणि लार्सन अँड टुब्रो यांचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

टॅग्स :शेअर बाजारपैसा