Join us

सेन्सेक्स २४२ अंकांनी आपटला, निफ्टी २०१५० अंकांच्या खाली; Raymond ५ टक्क्यांनी घसरला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 4:05 PM

बीएसई सेन्सेक्समधील सातत्यानं होणारी वाढ सोमवारी थांबली.

बीएसई सेन्सेक्समधील सातत्यानं होणारी वाढ सोमवारी थांबली. बीएसई सेन्सेक्स 241.79 अंक किंवा 0.36 टक्क्यांच्या घसरणीसह 67,596.84 अंकांवर बंद झाला. त्याचप्रमाणे एनएसई निफ्टी 59.05 अंकांच्या किंवा 0.29 टक्क्यांच्या घसरणीसह 20,133.30 अंकांच्या पातळीवर बंद झाला. इंडियन ओव्हरसीज बँकेच्या शेअर्समध्ये आज 15 टक्क्यांपर्यंत वाढ दिसून आली. मात्र, रेमंडच्या शेअर्समध्ये पाच टक्क्यांपर्यंत घसरण पाहायला मिळाली.

बीएसई सेन्सेक्सवर, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, इन्फोसिस, टाटा स्टील आणि अल्टाट्रॅक सिमेंटच्या शेअर्समध्ये एक टक्क्यांहून अधिक घसरण झाली. याशिवाय कोटक महिंद्रा बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, विप्रो, टेक महिंद्रा, जेएसडब्ल्यू स्टील, अॅक्सिस बँक, मारुती आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

या शेअर्समध्ये तेजीबीएसई सेन्सेक्सवर पॉवरग्रिड, टायटन, महिंद्रा अँड महिंद्रा, एनटीपीसी, बजाज फिनसर्व्ह, टाटा मोटर्स, नेस्ले इंडिया, आयटीसी, एबीआय, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, बजाज फायनान्स, एशियन पेंट्स आणि लार्सन अँड टुब्रो यांचे शेअर्स वाढीसह बंद झाले.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थितीजर आपण क्षेत्रीय निर्देशांकाबद्दल सांगायचं झालं तर पीएसयू बँकांमध्ये 3.5 टक्क्यांची वाढ दिसून आली. त्याचप्रमाणे पॉवर इंडेक्समध्ये एक टक्का, ऑटो इंडेक्समध्ये एक टक्का आणि एफएमसीजीमध्ये 0.5 टक्के वाढ दिसून आली. त्याच वेळी, रियल्टी निर्देशांकात एक टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. त्याच वेळी बँक, आयटी, फार्मा आणि मेटल निर्देशांकात 0.5-0.5 टक्क्यांची घसरण दिसून आली. बीएसई मिडकॅप निर्देशांकात 0.3 टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांकात 0.5 टक्क्यांची घसरण दिसून आली.

टॅग्स :शेअर बाजार