देशांतर्गत शेअर बाजार आज मोठ्या घसरणीसह बंद झाला. बीएसई सेन्सेक्स 388.40 अंकांनी म्हणजेच 0.59 टक्क्यांच्या घसरणीसह 65,151.02 अंकांच्या पातळीवर बंद झाला. निफ्टी 99.75 अंकांनी म्हणजेच 0.51 टक्क्यांनी घसरून 19,365.25 अंकांच्या पातळीवर बंद झाला. निफ्टीवरील आयटीसीचा शेअर सर्वाधिक दोन टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. तर अदानी पोर्ट्सचा शेअर 4.43 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.
या शेअर्समध्ये घसरण
बीएसई सेन्सेक्सवर आयटीसीचा शेअर (ITC) सर्वाधिक 2.04 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. त्याचप्रमाणे पॉवरग्रीड, रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन अँड टुब्रो, नेस्ले इंडिया, कोटक महिंद्रा बँक, बजाज फायनान्स, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा मोटर्स, एनटीपीसी, अल्ट्राटेक सिमेंट, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, इंडसइंड बँक, टीसीएस आणि एचयूएलचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.
या शेअर्समध्ये तेजी
टायटनचा शेअर सेन्सेक्सवर 2.12 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. त्याचप्रमाणे एसबीआय, बजाज फिनसर्व्ह, अॅक्सिस बँक, टाटा स्टील आणि सन फार्मा यांचे शेअर्सही वाढीसह बंद झाले.
क्षेत्रिय निर्देशांकांची स्थिती
पीएसयू बँक वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरणीसह बंद झाले. कॅपिटल गुड्स, ऑईल अँड गॅस, एनर्जी, एफएमजीसी आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्राशी संबंधित निर्देशांक 0.3-0.9 टक्क्यांनी घसरून बंद झाले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक किंचित वाढीसह बंद झाले.