Lokmat Money >शेअर बाजार > Closing Bell Today : सेन्सेक्स ५२९ अंकांनी वधारला, निफ्टी १९७०० अंकांच्या वर; या शेअर्मध्ये मोठी तेजी

Closing Bell Today : सेन्सेक्स ५२९ अंकांनी वधारला, निफ्टी १९७०० अंकांच्या वर; या शेअर्मध्ये मोठी तेजी

Closing Bell Today : देशांतर्गत शेअर बाजार आज वाढीसह बंद झाले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 04:11 PM2023-07-17T16:11:46+5:302023-07-17T16:12:06+5:30

Closing Bell Today : देशांतर्गत शेअर बाजार आज वाढीसह बंद झाले. 

Closing Bell Today Sensex gains 529 points Nifty above 19700 points Big boom in this stock know details | Closing Bell Today : सेन्सेक्स ५२९ अंकांनी वधारला, निफ्टी १९७०० अंकांच्या वर; या शेअर्मध्ये मोठी तेजी

Closing Bell Today : सेन्सेक्स ५२९ अंकांनी वधारला, निफ्टी १९७०० अंकांच्या वर; या शेअर्मध्ये मोठी तेजी

कामकाजाच्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजार मोठ्या उसळीसह बंद झाले. बीएसईचा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 529.03 अंकांच्या किंवा 0.80 टक्क्यांच्या वाढीसह 66,589.93 अंकांच्या पातळीवर बंद झाला. त्याचप्रमाणे एनएसई निफ्टी 156.65 अंकांच्या म्हणजेच 0.8 टक्क्यांच्या वाढीसह 19,721.15 अंकांवर बंद झाला. एसबीआयचा शेअर निफ्टीमध्ये सर्वाधिक 3.01 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. त्याचप्रमाणे विप्रोही 2.68 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.

सेन्सेक्सवर एसबीआयचा शेअर सर्वाधिक 2.96 टक्क्यांच्या उसळीसह बंद झाले. याचप्रकारे विप्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँकेचे शेअर्सही दोन टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. तर कोटक महिंद्रा बँक, इंडसइंड बँक, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, मारुती, एशियन पेंट्स, टाटा स्टील, अल्ट्राटेक सीमेंट आणि अॅक्सिस बँकेचे शेअर्स तेजीसह बंद झाले.

या शेअर्समध्ये घसरण
सेन्सेक्सवर टायटनचा सर्वाधिक 1.09 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. याच प्रकारे भारती एअरटेल, टाटा मोटर्स, टीसीएस, जेएसडब्ल्यू स्टील, महिंद्रा एंड महिंद्रा, नेस्ले इंडिया आणि एनटीपीसीचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

Web Title: Closing Bell Today Sensex gains 529 points Nifty above 19700 points Big boom in this stock know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.