Share Market Closing Bell Today: मंगळवारी देशांतर्गत शेअर बाजार तेजीसह बंद झाले. बीएसई सेन्सेक्स 79.22 अंकांच्या म्हणजेच 0.12 टक्क्यांच्या वाढीसह 65,075.82 अंकांच्या पातळीवर बंद झाला. त्याचप्रमाणे, एनएसई निफ्टी 36.60 अंकांच्या किंवा 0.19 टक्क्यांच्या वाढीसह 19,342.65 अंकांच्या पातळीवर बंद झाला. निफ्टीवरील जिओ फायनान्शियलचा शेअर पाच टक्क्यांच्या अपर सर्किटसह बंद झाला. त्याचप्रमाणे यूपीएल आणि हिंदाल्कोचे शेअर्सही प्रत्येकी दोन टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले. निफ्टीमध्ये भारती एअरटेल आणि हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे शेअर्स प्रत्येकी एक टक्क्यांहून अधिक घसरून बंद झाले.
या शेअर्समध्ये वाढ
जिओ फायनान्शियलचा शेअर सेन्सेक्सवर 4.72 टक्क्यांच्या सर्वाधिक वाढीसह बंद झाला. टाटा स्टीलचा शेअर 1.66 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. टेक महिंद्रा, एनटीपीसी, जेएसडब्ल्यू स्टील, पॉवरग्रिड, अल्ट्राटेक सिमेंट आणि एचसीएल टेक यांचे शेअर्स प्रत्येकी एक टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले. याशिवाय टायटन, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, एशियन पेंट्स, टाटा मोटर्स, लार्सन अँड टुब्रो, महिंद्रा अँड महिंद्रा, एसबीआय, बजाज फिनसर्व्ह आणि मारुतीच्या शेअर्समध्येही वाढ झाली.
या शेअर्समध्ये घसरण
भारती एअरटेल, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, अॅक्सिस बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडसइंड बँक, कोटक महिंद्रा बँक, सन फार्मा, आयसीआयसीआय बँक आणि आयटीसी यांचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.
क्षेत्रीय निर्देशांकांची स्थिती
जर वेगवेगळ्या सेक्टर्स बोललो तर, धातू, ऊर्जा आणि रिअल इस्टेट क्षेत्रात प्रत्येकी एका टक्क्यानं वाढ झाली आहे. त्याच वेळी, पीएसयू बँक, एफएमजीसी आणि फार्मा संबंधित क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये विक्री दिसून आली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात 0.5-0.5 टक्क्यांची उसळी दिसून आली.