Join us  

Closing Bell Today: सेन्सेक्स, निफ्टीनं गाठलं नवं शिखर; 'या' शेअर्समध्ये दिसली सर्वाधिक तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 4:38 PM

बुधवारी देशांतर्गत शेअर बाजारानं नवं शिखर गाठलं.

बुधवारी देशांतर्गत शेअर बाजारानं नवं शिखर गाठलं. बीएसई सेन्सेक्स 302.30 अंकांच्या म्हणजेच 0.45 टक्क्यांच्या वाढीसह 67,097.44 अंकांच्या पातळीवर बंद झाला. त्याचप्रमाणे, एनएसई निफ्टी 83.90 अंकांच्या म्हणजेच 0.42 टक्क्यांच्या वाढीसह 19,833.15 अंकांच्या पातळीवर बंद झाला. एनटीपीसी, बजाज फायनान्स आणि इंडसइंड बँकेचे शेअर्स निफ्टीमध्ये दोन टक्क्यांहून अधिक उसळीसह बंद झाले.

सर्व क्षेत्रीय निर्देशांक वाढीसह बंद झाले. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे शेअर्स दोन टक्क्यांच्या उसळीसह बंद झाले. त्याचप्रमाणे पॉवर, हेल्थकेअर आणि ऑइल अँड गॅसमध्ये 0.5-0.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. बीएसई मिडकॅप निर्देशांक आणि स्मॉलकॅप निर्देशांक 0.6-0.6 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.

या शेअर्समध्ये वाढबीएसई सेन्सेक्सवर एनटीपीसीच्या शेअरनं सर्वाधिक 2.86 टक्क्यांची उसळी घेतली. याशिवाय बजाज फायनान्स, इंडसइंड बँक आणि अल्ट्राटेक सिमेंटचे शेअर्स सुमारे 1 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. याशिवाय बजाज फिनसर्व्ह, एसबीआय, सन फार्मा, टाटा मोटर्स आणि आयटीसी यांचे शेअर्स प्रत्येकी एक टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. याशिवाय पॉवरग्रीड, कोटक महिंद्रा बँक, लार्सन अँड टुब्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज, महिंद्रा अँड महिंद्रा, एचडीएफसी बँक, जेएसडब्ल्यू स्टीलच्या शेअर्समध्येही तेजी दिसून आली.

या शेअर्समध्ये घसरणटीसीएस, भारती एअरटेल, मारुती, हिंदुस्थान युनिलिव्हर, नेस्ले इंडिया, आयसीआयसीआय बँक आणि टेक महिंद्रा यांचे शेअर्स सेन्सेक्सवर घसरणीसह बंद झाले.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक