देशांतर्गत शेअर बाजार आज तेजीसह बंद झाले. बीएसई सेन्सेक्स 232.23 अंकांच्या म्हणजेच 0.35 टक्क्यांच्या वाढीसह 65,953.48 अंकांच्या पातळीवर बंद झाला. त्याचप्रमाणे एनएसई निफ्टी 80.30 अंकांनी म्हणजेच 0.41 टक्क्यांच्या वाढीसह 19,597.30 अंकांच्या पातळीवर बंद झाला. निफ्टीवर डिव्हिस लॅब्स सर्वाधिक 4.51 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. त्याचप्रमाणे महिंद्रा अँड महिंद्राचा शेअर 4.33 टक्क्यांनी वाढला. त्याच वेळी, ब्रिटानियामध्ये 2.68 टक्क्यांची घसरण दिसून आली.
या शेअर्समध्ये तेजी
महिंद्रा अँड महिंद्राचा शेअर बीएसई सेन्सेक्सवर चार टक्क्यांहून अधिक उसळीसह बंद झाला. अशाप्रकारे सन फार्मा, बजाज फिनसर्व्ह, टीसीएस आणि इन्फोसिसच्या शेअर्सनं एका टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली. तर हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, जेएसडब्ल्यू स्टील, विप्रो, मारुती, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन अँड टुब्रो, पॉवरग्रीड, टायटन आणि इंडसइंड बँकेचे शेअर्स वाढीसह बंद झाले.
हे शेअर्स घसरले
एसबीआय, टाटा मोटर्स, अॅक्सिस बँक, बजाज फायनान्स, कोटक महिंद्रा बँक आणि एचडीएफसी बँकेचे समभाग सेन्सेक्सवर घसरणीसह बंद झाले.
रुपया मजबूत
डॉलरच्य तुलनेत रुपया 10 पैशांनी मजबूत होऊन 82.74 रुपयांच्या स्तरावर बंद झाला. यापूर्वीच्या सत्रात रुपया 82.84 रुपयांच्या स्तरावर बंद झाला होता.