Join us

Closing Bell Today: सेन्सेक्समध्ये २६७ अंकांची वाढ, निफ्टी १९३५० च्या पुढे; बजाज फायनान्समध्ये ३% वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 4:09 PM

सोमवारी देशांतर्गत शेअर बाजार तेजीसह बंद झाले.

सोमवारी देशांतर्गत शेअर बाजार तेजीसह बंद झाले. बीएसई सेन्सेक्स २६७.४३ अंकांच्या म्हणजेच ०.४१ टक्क्यांच्या वाढीसह ६५,२१६.०९ अंकांच्या पातळीवर बंद झाला. त्याचप्रमाणे एनएसई निफ्टी ८३.४५ अंकांच्या म्हणजेच ०.४३ टक्क्यांच्या वाढीसह १९,३९३.६० अंकांच्या पातळीवर बंद झाला. बजाज फायनान्स, अदानी पोर्ट्स, पॉवरग्रीड कॉर्प आणि अदानी एंटरप्रायझेस यांनी निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढ नोंदवली. त्याच वेळी रिलायन्स इंडस्ट्रीज, महिंद्रा अँड महिंद्रा, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, एसबीआय लाइफ इन्शुरन्स आणि बजाज ऑटोमध्ये घसरण दिसून आली.

या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढपॉवर ग्रिडचा शेअर बीएसई सेन्सेक्सवर सर्वाधिक २.५८ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. त्याचप्रमाणे इंडसइंड बँक, एनटीपीसी, भारती एअरटेल, आयटीसी, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस आणि नेस्ले इंडियाचे शेअर्स एक टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले. याशिवाय टाटा स्टील, टीसीएस, टायटन, अॅक्सिस बँक, जेएसडब्ल्यू स्टील, लार्सन अँड टुब्रो, टाटा मोटर्स, एशियन पेंट्स, विप्रो, कोटक महिंद्रा बँक, टेक महिंद्रा, एचसीएल टेक आणि एचयूएल कंपनीच्या शेअर्समध्येही वाढ दिसून आली.

हे शेअर्स घसरलेजिओ फायनान्सचा शेअर सेन्सेक्समध्ये सर्वाधिक 5 टक्क्यांनी घसरून बंद झाला. त्याचप्रमाणे रिलायन्स इंडस्ट्रीज, महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती, एसबीआय, अल्ट्राटेक सिमेंट आणि एचडीएफसी बँकेचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

सेक्टरल निर्देशांकाची स्थितीसर्व क्षेत्रीय निर्देशांक आज वाढीसह बंद झाले. रिअल इस्टेट, मेटल, पॉवर आणि कॅपिटल गुड्स यात १-२ टक्क्यांनी घसरण झाली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात प्रत्येकी एक टक्का वाढ दिसून आली.

टॅग्स :शेअर बाजार