Lokmat Money >शेअर बाजार > Closing Bell Today: ३३३ अंकांच्या उसळीसह शेअर बाजार बंद; निफ्टी १९८०० च्या पार, 'हे' स्टॉक्स वधारले

Closing Bell Today: ३३३ अंकांच्या उसळीसह शेअर बाजार बंद; निफ्टी १९८०० च्या पार, 'हे' स्टॉक्स वधारले

शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजार तेजीसह बंद झाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 05:00 PM2023-09-08T17:00:08+5:302023-09-08T17:00:16+5:30

शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजार तेजीसह बंद झाले.

Closing Bell Today Stock market closes with 333 points jump Nifty crossed 19800 These stocks rose | Closing Bell Today: ३३३ अंकांच्या उसळीसह शेअर बाजार बंद; निफ्टी १९८०० च्या पार, 'हे' स्टॉक्स वधारले

Closing Bell Today: ३३३ अंकांच्या उसळीसह शेअर बाजार बंद; निफ्टी १९८०० च्या पार, 'हे' स्टॉक्स वधारले

Closing Bell Today: शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजार तेजीसह बंद झाले. बीएसई सेन्सेक्स 333.35 अंकांच्या किंवा 0.50 टक्क्यांच्या वाढीसह 66,598.91 अंकांच्या पातळीवर बंद झाला. त्याचप्रमाणे NSE निफ्टी 92.90 अंकांच्या किंवा 0.47 टक्क्यांच्या वाढीसह 19,819.95 अंकांच्या पातळीवर बंद झाला. निफ्टीवर एनटीपीसी, कोल इंडिया आणि बीपीसीएलचे शेअर्स 2-2 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह बंद झाले. त्याच वेळी, यूपीएल आणि आयशर मोटर्सचे शेअर्स प्रत्येकी एक टक्क्यानं घसरले.

निरनिराळ्या क्षेत्रांबद्दल बोलायचं झाल्यास तर कॅपिटल गुड्स, ऑईल अँड गॅस, पॉवर आणि रिअल इस्टेट निर्देशांकात 1.5-2 टक्क्यांची उसळी दिसून आली. त्याच वेळी, फार्मा निर्देशांकात 0.3 टक्क्यांची घसरण झाली. बीएसई मिडकॅप निर्देशांकात 0.9 टक्क्यांची वाढ दिसून आली. तर स्मॉलकॅप निर्देशांकात 0.4 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली.

या शेअर्समध्ये वाढ
बीएसई सेन्सेक्सवर एनटीपीसी आणि टाटा मोटर्सचे शेअर्स 2-2 टक्क्यांहून अधिक उसळीसह बंद झाले. याशिवाय लार्सन अँड टुब्रो, बजाज फिनसर्व्ह, भारती एअरटेल यांचे शेअर्स एक टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले. याशिवाय एचडीएफसी बँक, टायटन, एसबीआय, रिलायन्स, पॉवरग्रिड, आयसीआयसीआय बँक, एचसीएल टेक, बजाज फायनान्स, मारुती, इंडसइंड बँक, कोटक महिंद्रा बँक, अॅक्सिस बँक आणि हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड यांचे शेअर्स वाढीसह बंद झाले.

या शेअर्समध्ये घसरण
अल्ट्राटेक सिमेंटचे शेअर्स सर्वाधिक घसरणीसह बंद झाले. याशिवाय आयटीसी, टेक महिंद्रा, विप्रो, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील आणि एशियन पेंट्सचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

Web Title: Closing Bell Today Stock market closes with 333 points jump Nifty crossed 19800 These stocks rose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.