Lokmat Money >शेअर बाजार > Closing Bell Today: शेअर बाजारात तेजी; हिंदुस्तान झिंकनं ३० दिवसांत पैसे केले दुप्पट, भेल घसरला

Closing Bell Today: शेअर बाजारात तेजी; हिंदुस्तान झिंकनं ३० दिवसांत पैसे केले दुप्पट, भेल घसरला

बुधवारी दिवसभरातील अस्थिर व्यवहारानंतर बीएसई सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी चांगल्या तेजीसह बंद झाला. बुधवारी बीएसई सेन्सेक्स २६८ अंकांच्या वाढीसह ७४२२१ अंकांवर बंद झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 03:54 PM2024-05-22T15:54:39+5:302024-05-22T15:54:47+5:30

बुधवारी दिवसभरातील अस्थिर व्यवहारानंतर बीएसई सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी चांगल्या तेजीसह बंद झाला. बुधवारी बीएसई सेन्सेक्स २६८ अंकांच्या वाढीसह ७४२२१ अंकांवर बंद झाला.

Closing Bell Today Stock market rally Hindustan Zinc doubled in 30 days BHEL fell | Closing Bell Today: शेअर बाजारात तेजी; हिंदुस्तान झिंकनं ३० दिवसांत पैसे केले दुप्पट, भेल घसरला

Closing Bell Today: शेअर बाजारात तेजी; हिंदुस्तान झिंकनं ३० दिवसांत पैसे केले दुप्पट, भेल घसरला

Closing Bell Today: बुधवारी दिवसभरातील अस्थिर व्यवहारानंतर बीएसई सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी चांगल्या तेजीसह बंद झाला. बुधवारी बीएसई सेन्सेक्स २६८ अंकांच्या वाढीसह ७४२२१ अंकांवर बंद झाला, तर निफ्टी ६९ अंकांच्या जोरावर २२५९८ अंकांवर बंद झाला. शेअर बाजाराच्या कामकाजात अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये बंपर तेजी दिसून आली. 
 

हिंदुस्थान झिंकच्या शेअर्सने गेल्या महिनाभरात गुंतवणूकदारांना १००% परतावा दिला आहे, तर तिमाही निकालानंतर भेलचे शेअर्स ५% घसरले आहेत. भारतात लोकसभा निवडणुका सुरू झाल्यापासून परदेशी गुंतवणूकदार दररोज १८०० कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री करताना दिसत आहेत.
 

बुधवारी कामकाजाच्या सुरुवातील शेअर बाजारात किरकोळ तेजी दिसून आली. नंतर शेअर बाजार रेड झोनमध्ये गेला. अखेर शेअर बाजाराचं कामकाज तेजीसह बंद झालं. शेअर बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर निफ्टी बँक, निफ्टी ऑटो आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांकात घसरण नोंदविण्यात आली, तर निफ्टी एफएमसीजी, निफ्टी फार्मा, निफ्टी आयटी, बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी मिडकॅप १०० निर्देशांकांनी तेजी नोंदविली.
 

कोण टॉप गेनर / लूझर
 

यामध्ये सिप्ला, टाटा कन्झ्युमर, एचयूएल, कोल इंडिया, ब्रिटानिया, डॉक्टर रेड्डीज आणि रिलायन्स या कंपन्यांच्या शेअर्सचा टॉप गेनर्समध्ये समावेश होता, तर श्रीराम फायनान्स, अपोलो हॉस्पिटल्स, एसबीआय, हिंडाल्को, हिरो मोटोकॉर्प, एचडीएफसी लाइफ आणि जेएसडब्ल्यू स्टील या कंपन्यांच्या शेअर्समद्ये घरसरण दिसून आली. शेअर बाजारातील तेजीमुळे कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल) आणि पॉवर ग्रिडच्या शेअर्सनं ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर गाठला.

Web Title: Closing Bell Today Stock market rally Hindustan Zinc doubled in 30 days BHEL fell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.