गुरुवारी देशांतर्गत शेअर बाजार घसरणीसह बंद झाले. बीएसई सेन्सेक्स 307.63 अंकांच्या म्हणजेच 0.47 टक्क्यांच्या घसरणीसह 65,688.18 अंकांच्या पातळीवर बंद झाला. त्याचप्रमाणे एनएसई निफ्टी 89.45 अंकांनी म्हणजेच 0.46 टक्क्यांनी घसरून 19,543.10 अंकांवर बंद झाला. एशियन पेंट्सचा शेअर आज तीन टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. त्याचवेळी अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्सचे शेअर्स सर्वाधिक उसळी घेऊन बंद झाले.
या शेअर्समध्ये घसरण
सेन्सेक्समध्ये एशियन पेंट्सचा शेअर सर्वाधिक 2.98 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. त्याचप्रमाणे कोटक महिंद्रा बँक, आयटीसी, भारती एअरटेल आणि अॅक्सिस बँकेचा शेअर एक टक्क्यांहून अधिक घसरून बंद झाले. याशिवाय आयसीआयसीआय बँक, नेस्ले इंडिया, टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक, एचसीएल टेक, मारुती, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, टीसीएस, लार्सन अँड टुब्रो, इन्फोसिस, एनटीपीसी आणि अल्ट्राटेक सिमेंटचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.
हे शेअर्स वधारले
बीएसई सेन्सेक्समध्ये इंडसइंड बँकेचा शेअर सर्वाधिक 1.59 टक्क्यांनी वाढून बंद झाले. याशिवाय जेएसडब्ल्यू स्टील, टायटन, बजाज फायनान्स, टेक महिंद्रा, पॉवरग्रीड, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि विप्रो यांचे शेअर्स वाढीसह बंद झाले.
रुपया मजबूत
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत आज रुपया 82.71 च्या स्तरावर बंद झाला. यापूर्वी रुपया 82.83 च्या पातळीवर बंद झाला होता.