सरकारी कंपनी कोचीन शिपयार्डच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी आली आहे. एक बातमी समोर येताच या शेअरच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड उडाली आहे. आज (सोमवारी) बॉम्बे स्टॉक एक्सचेन्जवर (BSE) कोचीन शिपयार्डचा शेअर जवळपास 6 टक्क्यांच्या तेजीसह 572.30 रुपयांवर पोहोचला आहे. एक मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याने कंपनीच्या शेअरमध्ये ही तेजी आली आहे. कोचीन शिपयार्डला डिफेन्स मिनिस्ट्रीकडून जवळपास 300 कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे.
कॉन्ट्रॅक्ट 24 महिन्यांत पूर्ण केला जाणार -
कोचीन शिपयार्डने (Cochin Shipyard) रेग्युलेटरी फायलिंगमध्ये म्हटले आहे की, इंडियन नेवीने आपल्याला L1 बिडर घोषित केले आहे. हा कॉन्ट्रॅक्ट एका इंडियन नेव्हल शिपच्या MR/मिड लाइफ अपग्रेड साठी आहे. या कॉन्ट्रॅक्टची अंदाजे किंमत जवळपास 300 कोटी रुपये एवढी आहे. हा कॉन्ट्रॅक्ट जवळपास 24 महिन्यांत पूर्ण करायचा आहे. या शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक 686.80 रुपयांवर पोहोचला आहे. तसेच, कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यातील निचांक 296.45 रुपये आहे.
वर्षांच्या आतच 85 टक्क्यांनी वधारला शेअर -
सरकारी कंपनी असलेल्या कोचीन शिपयार्डचा शेअर एका वर्षापेक्षाही कमी काळात 85 टक्क्यांनी वधारला आहे. कंपनीचा शेअर 20 जून 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेन्जवर (BSE) 301.60 रुपयांवर होता. कंपनीचा शेअर 12 जून 2023 रोजी बीएसईवर 572.30 रुपयांवर होता. गेल्या तीन वर्षांत कंपनीच्या शेअरमध्ये जवळपास 150 टक्क्यांची तेजी आली आहे. कंपनीचा शेअर 29 मे 2020 रोजी 224.60 रुपयांवर होता, तो आता 572.30 रुपयांवर पोहोचला आहे.