Join us  

सामान्यांचे नुकसान टळणार; आयपीओचे नियम कडक होणार; सेबीकडून मार्गदर्शक तत्त्वे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 11:19 AM

गुंतवणूकदारांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी बाजार नियामक सेबी म्युच्युअल फंड्ससाठी आयपीओमध्ये गुंतवणूक नियम कठोर करण्याच्या तयारीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गुंतवणूकदारांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी बाजार नियामक सेबी म्युच्युअल फंड्ससाठी आयपीओमध्ये गुंतवणूक नियम कठोर करण्याच्या तयारीत आहे. यासाठी सेबी लवकरच मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करेल. सध्या म्युच्युअल फंड्सकडून जवळपास सर्व आयपीओमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली आहे. त्यांनी नवीन तंत्रज्ञान कंपन्यांमध्येही मोठी गुंतवणूक केली असून, त्यांचे समभाग लिस्टिंगनंतर ७० टक्क्यांपर्यंत कोसळले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांचे नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठी सेबी सरसावली आहे.

सध्या म्युच्युअल फंड्स आयपीओमध्ये फंड हाउसच्या स्तरावर गुंतवणूक करतात. ते स्कीमच्या पातळीवर गुंतवणूक करत नाहीत. शेअर मिळाल्यानंतर फंड हाउस कोणत्या स्कीममध्ये आयपीओचा किती हिस्सा गुंतवणूक करेल, याचे काही नियम नाहीत. त्यामुळेच सेबी स्कीमच्या आधारावर आयपीओमध्ये गुंतवणुकीसाठी नियम जारी करेल. 

या वर्षी आयपीओ बाजारामध्ये वर्ष २०२१ च्या तुलनेत सुस्ती आली आहे. या वर्षी आतापर्यंत ३८ कंपन्यांनी आयपीओच्या माध्यमातून ६१ हजार कोटी रुपये गुंतवले आहेत, तर २०२१ मध्ये ६१ कंपन्यांनी तब्बल १.२०  लाख कोटी रुपये जमवले होते. २.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक नवीन तंत्रज्ञान कंपन्यांची लिस्टिंगनंतर बुडाली आहे.

नवीन वर्षात किती आयपीओ? 

प्राइम डेटाबेसनुसार ५५ कंपन्यांना आयपीओच्या माध्यमातून ८४,००० कोटी जमा करण्याची परवानगी मिळाली आहे. २७ कंपन्यांना अजून मंजुरी मिळणे बाकी आहे. त्यामुळे नवीन वर्षात अनेक आयपीओ येतील. 

म्युच्युअल फंड्सचा नवीन टेक कंपन्यांवर विश्वास

कंपनी    फंड्सची संख्या    हिस्सा नायका    २३    २.१६% झोमॅटो    २०    ४.५७% पेटीएम    १९    १.२६% पॉलिसी बाजार    १६    ४.६८% डेलहिवरी    १३    ६.९६% कारट्रेंड टेक    ०६    ३.१२% 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :शेअर बाजारइनिशिअल पब्लिक ऑफरिंग