Join us  

कंपनीला मिळालं ₹६२३ कोटी रुपयांचं कंत्राट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, किंमत ₹१०० पेक्षाही कमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 11:39 AM

कामकाजादरम्यान सकाळी कपनीच्या शेअर्समध्ये १५ टक्क्यांपेक्षा अधिक तेजी दिसून आली.

शनिवारी शेअर बाजारात तेजी दिसून आली. कामकाजादरम्यान सकाळी HFCL शेअर्समध्ये १५ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली. त्यानंतर शेअरचा भाव ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचला. कंपनीला तब्बल ६२३ कोटी रुपयांचे कं मिळाले आहे. त्यामुळे शनिवारी कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. या स्टॉकची किंमत १०० रुपयांपेक्षाही कमी आहे. 

शुक्रवारी कामकाजाच्या अखेरच्या सत्रात कंपनीचे शेअर्स ९०.७० रुपयांवर बंद झाले होते. परंतु शनिवारी कामकाजादरम्यान ९७.९० रुपयांवर पोहोचले होते. एचएफसीएलचं मार्केट कॅप १३६०० कोटी रुपये आहे.

बीएसएनएलकडून मोठं काम

कंपनीनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार देशांतर्गत दूरसंचार सेवा प्रदात्याकडून ६२३ कोटी रुपयांचे कंत्राट मिळालं आहे. कंपनीला 5G नेटवर्कशी संबंधित नेटवर्किंग उपकरणं तयार करायची आहेत. यापूर्वी १ जानेवारी रोजी कंपनीला बीएसएनएलकडून ११२७ कोटी रुपयांचं काम मिळालं होतं. कंपनी टेलिकॉम ऑपरेटर्ससाठी डिजिटल नेटवर्किंग इत्यादी तयार करते.

कशी आहे कामगिरी?

गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये ३२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, ज्या गुंतवणूकदारांनी सहा महिन्यांपूर्वी यात गुंतवणूक केली होती त्यांना आतापर्यंत ४५ टक्क्यांपर्यंत नफा मिळाला आहे. गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून चांगली गोष्ट म्हणजे केवळ एका महिन्यात कंपनीच्या शेअरच्या किमतीत २७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकपैसाशेअर बाजार