Join us  

९ बोनस शेअर्स देतेय ही कॅपनी, रेकॅार्ड डेट झाली निश्चित; ₹१२ चा आहे हा शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 2:34 PM

जोंजुआ ओव्हरसीजच्या शेअरची किंमत सध्या 12.23 रुपये आहे.

Jonjua Overseas Bonus share: जोंजुआ ओव्हरसीज लिमिटेडच्या बोर्ड मेंबर्सनं 9:50 च्या प्रमाणात बोनस शेअर्स जाहीर केले आहेत. याचा अर्थ असा की रेकॉर्ड तारखेला असलेल्या प्रत्येक 50 पेड इक्विटी शेअर्समागे 9 बोनस शेअर्स शेअरधारकांना दिले जातील. यासाठी 10 ऑक्टोबर ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. जोंजुआ ओव्हरसीजच्या शेअरची किंमत सध्या 12.23 रुपये आहे.

कंपनीच्या शेअरनं गेल्या 3 महिन्यांत आपल्या शेअरधारकांना 53 टक्के परतावा आणि YTD 41 टक्के परतावा दिला. जोंजुआ ओव्हरसीजने बोनस रिलीझसाठी रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. कंपनीच्या एक्सचेंज फाइलिंगनुसार, 'कंपनीच्या संचालक मंडळानं 9:50 (9 फुल पेड इक्विटी) च्या प्रमाणात फुल पेड बोनस शेअर जारी करण्यास मान्यता दिली आहे आणि शिफारस केली आहे. कंपनीच्या प्रत्येक 50 शेअर्समागे कंपनीचे 9 शेअर्स बोनस शेअर्स अंतर्गत दिले जातील. यासाठी 10 ऑक्टोबर ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आल्याचं कंपनीनं म्हटलंय.कंपनीबाबत माहितीजोंजुआ ओव्हरसीज लिमिटेड एक आयटी अनेबल आणि सर्टिफाईड सेवा प्रदान करते. हे स्टार्टअप कन्सल्टन्सी, प्रोजेक्ट फायनान्स आणि आयपीओ, कायदेशीर आणि अकाऊंट आउटसोर्सिंग, वेबसाइट आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, बिझनेस प्लॅनिंग आणि क्रॉस बॉर्डर मार्केटिंग सेवांसह माहिती तंत्रज्ञान आणि व्यवसाय सेवा प्रदान करते. कंपनी जगभरातील ग्राहकांना सेवा देत आहे.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक