Lokmat Money >शेअर बाजार > KFC आणि पिझ्झा हटच्या कंपनीच्या शेअर ५ भागांमध्ये स्प्लिट होणार; रेकॉर्ड डेट निश्चित, शेअर सुस्साट

KFC आणि पिझ्झा हटच्या कंपनीच्या शेअर ५ भागांमध्ये स्प्लिट होणार; रेकॉर्ड डेट निश्चित, शेअर सुस्साट

केएफसी आणि पिझ्झा हट चेन चालवणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये मंगळवारी प्रचंड वाढ झाली. दरम्यान, मंगळवारी हा शेअर ४ टक्क्यांनी वधारून १,६२८.२५ रुपयांवर पोहोचला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 03:35 PM2024-08-20T15:35:49+5:302024-08-20T15:38:25+5:30

केएफसी आणि पिझ्झा हट चेन चालवणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये मंगळवारी प्रचंड वाढ झाली. दरम्यान, मंगळवारी हा शेअर ४ टक्क्यांनी वधारून १,६२८.२५ रुपयांवर पोहोचला.

Company shares of KFC and Pizza Hut Sapphire Foods to be split into 5 parts Record date fixed share booming | KFC आणि पिझ्झा हटच्या कंपनीच्या शेअर ५ भागांमध्ये स्प्लिट होणार; रेकॉर्ड डेट निश्चित, शेअर सुस्साट

KFC आणि पिझ्झा हटच्या कंपनीच्या शेअर ५ भागांमध्ये स्प्लिट होणार; रेकॉर्ड डेट निश्चित, शेअर सुस्साट

केएफसी आणि पिझ्झा हट चेन चालवणाऱ्या सफायर फूड्स (Sapphire Foods) इंडिया लिमिटेड या कंपनीच्या शेअरमध्ये मंगळवारी प्रचंड वाढ झाली. मंगळवारी मुंबई शेअर बाजारात सफायर फूड्सचा शेअर ४ टक्क्यांनी वधारून १,६२८.२५ रुपयांवर पोहोचला. सफायर फूड्सच्या शेअरमध्ये तेजी आली असून शेअर स्प्लिटची रेकॉर्ड डेट जाहीर झाल्यानंतर ही तेजी आली आहे. सफायर फूड्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर १८७८ रुपये आहे. तर कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर १२१८.५० रुपये आहे.

५ भागांत स्प्लिट होणार शेअर

सफायर फूड्स ही कंपनी आपले शेअर्स ५ भागांमध्ये विभागणार आहे. कंपनी १० रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या शेअरची २ रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या ५ शेअर्समध्ये विभागणी करत आहे. कंपनीनं शेअर स्प्लिटची रेकॉर्ड डेट ५ सप्टेंबर २०२४ निश्चित केली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत कंपनीची एकत्रित विक्री वार्षिक आधारावर १० टक्क्यांनी वाढून ७१६.५ कोटी रुपये झालीये. तर कंपनीचा ऑपरेटिंग नफा १ टक्क्यांनी वाढून १२४.२ कोटी रुपये झालाय.

वर्षभरात २० टक्क्यांहून अधिक वाढ

गेल्या वर्षभरात सफायर फूड्स (Sapphire Foods) इंडिया लिमिटेडच्या शेअरमध्ये २० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. २१ ऑगस्ट २०२३ रोजी कंपनीचा शेअर १३३७.३० रुपयांवर होता. २० ऑगस्ट २०२४ रोजी सफायर फूड्सचा शेअर १६२८.२५ रुपयांवर पोहोचला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीने भारतात १३ केएफसी आणि १ पिझ्झा हट रेस्टॉरंट जोडलं आहे.

सफायर फूड्सच्या (Sapphire Foods) एकूण रेस्टॉरंटची संख्या ८८६ झाली आहे. सफायर फूड्स इंडिया लिमिटेड ही यम ब्रँड्सची फ्लॅगशिप फ्रँचायझी ऑपरेटर आहे. भारत श्रीलंका आणि मालदीवमध्ये केएफसी, पिझ्झा हट आणि टॅको बेल रेस्टॉरंट्सचं व्यवस्थापन करतं. समरजित अॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड या नावानं २००९ मध्ये या कंपनीची स्थापना झाली. २०१५ मध्ये त्याचं सफायर फूड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड असं नाव करण्यात आलं.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Company shares of KFC and Pizza Hut Sapphire Foods to be split into 5 parts Record date fixed share booming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.