गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. ज्याचा गुंतवणूकदारांना खूप फायदा होत आहे. पण सीएल एड्युकेट (CL Educate Share) ही त्या कंपन्यांपैकी एक आहे ज्यांनी या वर्षी एकूणच चांगली कामगिरी केली आहे. पोझिशनल गुंतवणूकदारांना कंपनीने यावर्षी आतापर्यंत 43.78 टक्के परतावा दिला आहे. सीएल एड्युकेटन आता गुंतवणूकदारांना बोनस शेअर देण्याची तयारी केली आहे. कंपनीने या बोनस इश्यूसाठी रेकॉर्ड डेटदेखील जाहीर केलीये.
सीएल एड्युकेटने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "कंपनीचे बोर्ड 5 रुपये दर्शनी मूल्याच्या 1 शेअरसाठी 1 शेअर बोनस म्हणून देईल." कंपनीने यासाठी 16 डिसेंबर 2022 ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. म्हणजेच 16 डिसेंबर रोजी ज्या गुंतवणूकदारांचे नाव कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये असेल त्यांनाच बोनस शेअर्स दिले जातील.
मंगळवारी म्हणजेच 6 डिसेंबर 2022 रोजी कंपनीचे शेअर्सना 10 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले. त्यानंतर सीएल एड्युकेटच्या शेअरची किंमत 169.10 रुपयांवर पोहोचली. तथापि, नंतर कंपनीचे शेअर्स थोड्या घसरणीनंतर बीएसईवर 164.90 रुपयांवर बंद झाले. सीएल एड्युकेटचे शेअर्स गेल्या 6 महिन्यांत 28.16 टक्क्यांनी वाढले आहेत. दुसरीकडे, 1 महिन्यापूर्वी, कोणत्याही गुंतवणूकदाराने कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली असती तर त्याला 10.98 टक्के परतावा मिळाला असता. कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांक 190 रुपये आहे. तर 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 97 रुपये आहे.