Join us  

एक बातमी अन् कंस्ट्रक्शन कंपनीचा शेअर बनला रॉकेट, खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹55 वर पोहोचली किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 5:06 PM

कंपनीचा शेअर आज ट्रेडिंगदरम्यान 5 टक्यांनी वधारून अप्पर सर्किटवर होता. हा शेअर आता 55.40 रुपयांवर पोहोचला आहे.

पटेल इंजिनिअरिंगच्या (Patel Engineering Ltd share) शेअर्समध्ये आज अर्थात शुक्रवारी जबरदस्त तेजी दिसून आली आहे. कंपनीचा शेअर ट्रेडिंगदरम्यान 5 टक्यांनी वधारून अप्पर सर्किटवर होता. हा शेअर आता 55.40 रुपयांवर पोहोचला आहे. खरे तर, या शेअरमध्ये ही तेजी एका बातमीनंतर आली आहे. कंपनीच्या संयुक्त उपक्रमाद्वारे, महाराष्ट्र कृष्णा वैली डेव्हलपमेंट कॉरपोरेशनकडून 249.96 कोटी रुपयांच्या सिंचन प्रकल्पासाठी, सर्वात कमी बोली लवणाऱ्याची घोषणा करण्यात आली आहे.

मिळालेल्या कॉन्ट्रॅक्टनुसार, पटेल इंजिनिअरिंगचा वाटा (40 टक्के) 99.98 कोटी रुपये एवढा आहे. यात नीरा देवघर ते उजव्या तटाच्या मुख्य कालव्यासाठी 66 ते 76 किमीपर्यंत पाइप लाइन डिस्ट्रिब्यूटर नेटवर्कच्या कामाचा समावेश आहे. हे काम 30 महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करायचे आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये खंडाळा तालुक्यातील वाघोशी ते कपडगांव, दरम्यान होणार आहे. कंपनीने सप्टेंबर महिन्यात आपल्या जेव्ही पार्टनरसह, मध्य प्रदेश जल निगमकडून 1,275.30 कोटी रुपयांच्या शहरी इंफ्रा विकास प्रकल्पासाठी अवॉर्ड मिळाली होती. 

ऑगस्टमध्ये मिळाला होता कॉन्ट्रॅक्ट -पटेल इंजिनिअरिंग आणि त्यांच्या संयुक्त उपक्रम भागीदाराला, एनएचपीसी लिमिटेडकडून लॉट-4 साठी सिव्हिल कामांच्या निर्मितीसाठी मल्टीनॅशनल प्रोजेक्टचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता. यात कंपनीचा वाटा 1,818.56 कोटी रुपये एवढा आहे. मध्य प्रदेश सरकारच्या उपक्रमात, इंजिनिअरिंग, खरेदी, बांधकाम, परीक्षण, कमिशनिंग, ट्रायल रन, तसेच 10 वर्षांसाठी ऑपरेशन आणि देखभालीसाठी 1,275.30 कोटी रुपयांच्या काँट्रॅक्टकरिता  संयुक्त उपक्रम डीलमध्ये पटेल इंजिनीअरिंगला सर्वात कमी बोलीदार म्हणून घोषित करण्यात आले. कॉन्ट्रॅक्टमध्ये कंपनीचा वाटा 35 टक्के एवढा आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक