Lokmat Money >शेअर बाजार > Crorepati Stock: पहिले ४६५००% नफा, आता कंपनी देणार डिविडेंड, एका शेअरवर होणार इतका नफा 

Crorepati Stock: पहिले ४६५००% नफा, आता कंपनी देणार डिविडेंड, एका शेअरवर होणार इतका नफा 

गुंतवणूकदारांना प्रचंड कमाई करुन देणाऱ्या कंपनीनं लाभांश जाहीर केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 03:21 PM2024-01-27T15:21:51+5:302024-01-27T15:24:30+5:30

गुंतवणूकदारांना प्रचंड कमाई करुन देणाऱ्या कंपनीनं लाभांश जाहीर केला आहे.

Crorepati Stock First 46500 percent profit Shriram Finance Share Price now company will give dividend so much profit on 1 share | Crorepati Stock: पहिले ४६५००% नफा, आता कंपनी देणार डिविडेंड, एका शेअरवर होणार इतका नफा 

Crorepati Stock: पहिले ४६५००% नफा, आता कंपनी देणार डिविडेंड, एका शेअरवर होणार इतका नफा 

गुंतवणूकदारांना प्रचंड कमाई करुन देणाऱ्या कंपनीनं लाभांश जाहीर केला आहे. हा लाभांश कंपनीच्या त्या गुंतवणूकदारांना दिला जाईल ज्यांच्याकडे श्रीराम फायनान्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स आहेत (Shriram Finance Share Price). यासाठी रेकॉर्ड डेटही निश्चित करण्यात आली आहे. एका शेअरवर 10 रुपये लाभांश दिला जाईल.

2023 मध्ये, कंपनीने गुंतवणूकदारांना तीनदा लाभांशाचा लाभ दिला होता. गेल्या वर्षी पात्र गुंतवणूकदारांना एका शेअरवर 55 रुपये लाभांश मिळाला होता. 2022 मध्येही गुंतवणूकदारांना लाभांशही देण्यात आला. आता कंपनीने 2024 साठी लाभांश जाहीर केला होता. 23 जानेवारी रोजी कंपनीनं 10 रुपयांच्या फेस व्हॅल्युवर 10 रुपयांचा लाभांश जाहीर केला होता.

दिला 46500 टक्के रिटर्न

श्रीराम फायनान्स लिमिटेडचे ​​शेअर्स 1999 मध्ये 5 रुपयांवर शेअर बाजारात लिस्ट झाले होते. तेव्हापासून हा शेअर झपाट्यानं वाढत आहे. आतापर्यंत या कंपनीच्या स्टॉकनं 46,539.84% परतावा दिलाय. 25 वर्षांत हा शेअर 5 रुपयांवरून 2,318 रुपये प्रति शेअरवर पोहोचलाय. या शेअरनं एका महिन्यात 13 टक्के परतावा दिला आहे. सहा महिन्यांत 28 टक्के आणि एका वर्षात 87 टक्के परतावा दिला आहे.

पाच वर्षात किती फायदा

श्रीराम फायनान्स लिमिटेडनं पाच वर्षांत 127 टक्के रिटर्न दिला आहे. कंपनीचं मार्केट कॅप 8 ट्रिलियन रुपये आहे. या कंपनीची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 2,352.95 रुपये आहे आणि नीचांकी पातळी 1,190 रुपये प्रति शेअर आहे.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकारांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Crorepati Stock First 46500 percent profit Shriram Finance Share Price now company will give dividend so much profit on 1 share

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.