Join us

५ दिवसांत कच्च्या तेलाच्या किमतीत ६ टक्क्यांनी वाढ, देशात पेट्रोल-डिझेल महागणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 13:32 IST

crude oil: गेल्या पाच दिवसांत कच्च्या तेलाच्या किमती ६ टक्क्यांनी वाढल्या आहेत. जे गेल्या ३ आठवड्यांतील सर्वोच्च पातळीवर आहे.

Inflation : कर्जाचे ईएमआय महाग झाल्यानंतर सर्वसामांन्याना आणखी एक चटका बसणार असल्याची चिन्हं आहे. सध्या मध्यपूर्वेत मोठ्या प्रमाणात संघर्ष सुरू आहे. याचा बाहेरच्या जगावरही घातक परिणाम होणार आहे. भारतातील लोकांनाही याचा मोठा फटका बसू शकतो. रशिया आणि इराणवर युरोपियन युनियनच्या निर्बंधांमुळे कच्च्या तेलाची पुरवठा लाइन आता कमकुवत होऊ लागली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचा तुटवडा जाणवू शकतो. या भीतीमुळे गेल्या ५ दिवसांत कच्च्या तेलाच्या किमती ६ टक्क्यांनी वाढल्या आहेत. जी गेल्या ३ आठवड्यातील उच्चांकी पातळी आहे. अशीच परिस्थिती राहिली आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या नाहीत तर भारतातही पेट्रोल आणि डिझेल महाग होऊ शकते.

अमेरिकन बाजारातील दरकपातीचा परिणामएकीकडे कच्च्या तेलाचा पुरवठा कमी झाल्याने आणि दुसरीकडे अमेरिकेने व्याजदरात कपात केल्यामुळे कच्च्या तेलाची खरेदी वाढल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. जागतिक इंधन म्हणून कच्च्या तेलाच्या मागणीला यूएस फेडरल रिझर्व्हकडून सातत्याने प्रोत्साहन दिले जात आहे. यामुळे ब्रेंट फ्युचर्स १.०८ किंवा १.५ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ७४.४९ वर पोहोचले. यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI) क्रूड १.२७ किंवा १.८ टक्क्यांनी वाढून ७१.२९ वर पोहोचले. गेल्या ३ आठवड्यांतील कच्च्या तेलाची ही सर्वोच्च किंमत होती. त्याच वेळी, WTI ने सोमवार ते शुक्रवार या ५ दिवसांत कच्च्या तेलात ६ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. तो गेल्या शुक्रवारी ७ नोव्हेंबरनंतरच्या सर्वोच्च पातळीवर बंद झाला. भारतीय बाजारपेठेत, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर कच्च्या तेलाचे वायदे १.१ टक्क्यांनी वाढले आणि प्रति बॅरल ६,०४४ रुपयांवर बंद झाले.

तेलाच्या किमती आणखी वाढणार?कच्च्या तेलाच्या किमती आणखी वाढतील, असे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे. चिनी आकडेवारी दर्शवते की जगातील सर्वात मोठा आयातदार चीनकडून कच्च्या तेलाची आयात ७ महिन्यांत प्रथमच वार्षिक आधारावर नोव्हेंबरमध्ये वाढली आहे. २०२५ च्या सुरुवातीपर्यंत ते उच्च पातळीवर राहील. युरोपियन युनियननेही रशियावर अनेक प्रकारचे निर्बंध लादण्याचे मान्य केले आहे. अमेरिकाही अशा अनेक पावलांचा विचार करत आहे. यावरून आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :पेट्रोलपेट्रोल पंपशेअर बाजारशेअर बाजार