Danish Power IPO Listing : ट्रान्सफॉर्मर उत्पादक दानिश पॉवर लिमिटेडचे शेअर्स धनत्रयोदशीच्या दिवशी मंगळवारी, २९ ऑक्टोबर रोजी एनएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर लिस्ट झाले. कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग जबरदस्त झाली आहे. शेअर ३८० रुपयांच्या आयपीओ किमतीपेक्षा ५० टक्के प्रीमियमसह ५७० रुपयांवर लिस्ट झाला. दानिश पॉवरचा आयपीओ २२ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर दरम्यान सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला. दानिश पॉवरच्या आयपीओसाठी प्राइस बँड ३६० ते ३८० रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला होता.
गुंतवणूकदारांचा उत्तम प्रतिसाद
दानिश पॉवरच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. हा इश्यू जवळपास १२७ पट सब्सक्राइब करण्यात आला. क्वालिफाईड इन्स्टिट्युशन बायर्सच्या श्रेणीत १०४.७९ पट, तर नॉन इन्स्टिट्युशन इनव्हेस्टर्सच्या श्रेणीत २७५.९२ पट बोली लागली. किरकोळ गुंतवणूकदारांच्या श्रेणीत ७९.८८ पट बोली लागली. किरकोळ गुंतवणूकदारांना एका लॉटमध्ये किमान ३०० शेअर्स खरेदी करणं आवश्यक होतं, त्यामुळे गुंतवणुकीची किमान रक्कम १,१४,००० रुपयांपर्यंत होती. यामध्ये १९७.९० कोटी रुपयांच्या ५२.०८ लाख शेअर्सचा हा पूर्णपणे नवीन इश्यू आहे. लिंक इनटाइम इंडिया प्रा. हे दानिश पॉवर आयपीओचे रजिस्ट्रार होते.
कंपनीचा व्यवसाय काय?
दानिश पॉवरनं आपल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमध्ये दिलल्या माहितीनुसार ते आयपीओमधून मिळणाऱ्या रकमेचा वापर राजस्थानमधील जयपूर येथील महिंद्रा वर्ल्ड सिटी युनिटमध्ये शेड उभारणीसाठी आणि अतिरिक्त प्लांट तसंच मशिनरी उभारण्यासाठी करणार आहेत. उर्वरित रक्कम कार्यशील भांडवल, कर्जाची परतफेड आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरली जाईल.
दानिश पॉवर लिमिटेड विविध प्रकारचे ट्रान्सफॉर्मर तयार करते. यामध्ये इन्व्हर्टर ड्युटी ट्रान्सफॉर्मर आणि ऑईल अँड ड्राय टाईप वीज व डिस्ट्रिब्युशन ट्रान्सफॉर्मरचा समावेश आहे. जयपूरमधील सीतापुरा इंडस्ट्रियल एरिया आणि राजस्थानमधील महिंद्रा वर्ल्ड सिटी येथे कंपनीचे दोन मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)