Join us

Rathi Steel & Power Share: ₹८ वरुन ₹८४ वर आला 'हा' शेअर, अजूनही वाढतोय Stock; कर्जमुक्त आहे कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 3:41 PM

Rathi Steel & Power Share: या कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने वाढ दिसून येत आहे. कंपनीच्या शेअरनं आज ५ टक्क्यांचा उच्चांक गाठला. यानंतर शेअरला अपर सर्किट लागलं.

राठी स्टील पॉवर लिमिटेडच्या शेअरमध्ये सातत्याने वाढ दिसून येत आहे. कंपनीच्या शेअरनं आज ५ टक्क्यांचा उच्चांक गाठला आणि हा शेअर ८४.५१ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. गेल्या अनेक सत्रांपासून या शेअरमध्ये सातत्यानं तेजी दिसून येत आहे. गेल्या पाच दिवसांत कंपनीचा शेअर २२ टक्क्यांनी वधारलाय. 

कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ८.६३ रुपये केला आहे. अवघ्या दोन आठवड्यांत हा शेअर ७० टक्क्यांहून अधिक वधारलाय. कंपनी कर्जमुक्त झाली आहे. वर्षभरात हा शेअर १००० टक्क्यांनी वधारला आहे. वर्षभरापूर्वी या शेअरची किंमत ८ रुपये होती.

तिमाही निकाल काय ?

तिमाही निकालानुसार, आर्थिक वर्ष २०२४ च्या चौथ्या तिमाहीत निव्वळ विक्री १७ टक्क्यांनी वाढून ११८.३५ कोटी रुपये आणि निव्वळ नफा २,४५७ टक्क्यांनी वाढून २०.२० कोटी रुपये झाला आहे. आपल्या वार्षिक निकालांमध्ये कंपनीनं आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ४९२.८३ कोटी रुपयांची निव्वळ विक्री आणि २३.६१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला, तर आर्थिक वर्ष २०२३ मध्ये कंपनीनं ७२६.५५ कोटी रुपयांची निव्वळ विक्री आणि ८७.४७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता. मार्च २०२४ पर्यंत कंपनीच्या प्रवर्तकांचा हिस्सा ४०.३२ टक्के, डीआयआयचा २.५३ टक्के आणि पब्लिक होल्डिंग ५७.१५ टक्के आहे.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक