Lokmat Money >शेअर बाजार > Dee Development IPO Listing: गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, ६७% प्रीमिअमवर लिस्ट झाला IPO

Dee Development IPO Listing: गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, ६७% प्रीमिअमवर लिस्ट झाला IPO

पाइपिंग सोल्युशन्स कंपनी डी डेव्हलपमेंट इंजिनीअर्स लिमिटेडचा (Dee Development Engineers Ltd) आयपीओ आज शेअर बाजारात लिस्ट झाला. बंपर सब्सक्रिप्शननंतर याचं ६७ टक्के प्रीमिअमवर दमदार लिस्टिंग झालं.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 11:47 AM2024-06-26T11:47:03+5:302024-06-26T11:47:19+5:30

पाइपिंग सोल्युशन्स कंपनी डी डेव्हलपमेंट इंजिनीअर्स लिमिटेडचा (Dee Development Engineers Ltd) आयपीओ आज शेअर बाजारात लिस्ट झाला. बंपर सब्सक्रिप्शननंतर याचं ६७ टक्के प्रीमिअमवर दमदार लिस्टिंग झालं.

Dee Development IPO Listing investors huge profit on first day IPO listed at 67 percent premium know details | Dee Development IPO Listing: गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, ६७% प्रीमिअमवर लिस्ट झाला IPO

Dee Development IPO Listing: गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, ६७% प्रीमिअमवर लिस्ट झाला IPO

Dee Development IPO Listing: पाइपिंग सोल्युशन्स कंपनी डी डेव्हलपमेंट इंजिनीअर्स लिमिटेडचा (Dee Development Engineers Ltd) आयपीओ आज शेअर बाजारात लिस्ट झाला. बंपर सब्सक्रिप्शननंतर याचं ६७ टक्के प्रीमिअमवर दमदार लिस्टिंग झालं. बीएसईवर तो ६० टक्क्यांहून अधिक प्रीमियमसह ३२५ रुपयांवर आणि एनएसईवर ६७ टक्के प्रीमियमसह ३३९ रुपयांवर लिस्ट झाला आहे. कंपनीनं ४१८ कोटींचा आयपीओ आणला होता, त्यापैकी ९३ कोटी ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून आले होते. या आयपीओची इश्यू प्राइस १९३ ते २०३ रुपये होती. दरम्यान, आयपीओ १०१ पट सब्सक्राइब झाला.

क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्सचा हिस्सा २०६.५४ पट, नॉन इस्टिट्युशनल इनव्हेस्टर्सचा हिस्सा १४९.३८ पट आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठीचा हिस्सा २३.६६ पट सबस्क्राईब झाला होता. आयपीओपूर्वी कंपनीनं अँकर गुंतवणूकदारांकडून १२५ कोटी रुपयांहून अधिक रक्कम गोळा केली होती. १९ फंड हाऊसेसना २०३ रुपये प्रति शेअर या दरानं ६१.६३ लाख इक्विटी शेअर्सचं वाटप करण्यात आलं.

काय करते कंपनी?

कंपनी आयपीओमधून मिळणाऱ्या रकमेचा वापर वर्किंग कॅपिटलच्या गरजा भागविण्यासाठी, थकित कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी करणार आहे. डी डेव्हलपमेंट इंजिनीअर्स कंपनी इंजिनीअरिंग, प्रोक्योरमेंट आणि मॅन्युफॅक्चरिंगद्वारे केमिकल्स आणि अन्य प्रोसेस इंडस्ट्रिजसारख्या उद्यांसाठी स्पेसलाईज्ड प्रोसेस पायपिंग सोल्युशन पुरवण्याचं काम करते. तसंच पाइपिंग प्रॉडक्ट्सची निर्मिती करते.

प्रोसेस पायपिंग सोल्युशनमधील मोठी कंपनी

कंपनीचे ७ उत्पादन प्रकल्प आहेत, त्यापैकी ३ पलवल (हरियाणा), १ अंजार (गुजरात), १ राजस्थानमधील बाडमेर, १ आसाममधील नुमालीगड आणि १ बँकॉक, थायलंड येथे आहे. डी डेव्हलपमेंट ही स्थापित क्षमतेच्या दृष्टीने देशातील प्रोसेस पाईपिंग सोल्यूशन्समधील सर्वात मोठी कंपनी मानली जाते.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Dee Development IPO Listing investors huge profit on first day IPO listed at 67 percent premium know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.