Lokmat Money >शेअर बाजार > उघडताच १००% सबस्क्राइब झाला IPO, किरकोळ गुंतवणूकदारांच्या उड्या; किती आहे GMP?

उघडताच १००% सबस्क्राइब झाला IPO, किरकोळ गुंतवणूकदारांच्या उड्या; किती आहे GMP?

Deepak Builders and Engineers IPO : कंपनीचा आयपीओ उघडताच त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. जाणून घेऊया अधिक डिटेल्स.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 02:25 PM2024-10-21T14:25:08+5:302024-10-21T14:25:08+5:30

Deepak Builders and Engineers IPO : कंपनीचा आयपीओ उघडताच त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. जाणून घेऊया अधिक डिटेल्स.

Deepak Builders and Engineers IPO 100 percent subscribed at opening retail investors jump whole quota booked How much is GMP | उघडताच १००% सबस्क्राइब झाला IPO, किरकोळ गुंतवणूकदारांच्या उड्या; किती आहे GMP?

उघडताच १००% सबस्क्राइब झाला IPO, किरकोळ गुंतवणूकदारांच्या उड्या; किती आहे GMP?

Deepak Builders and Engineers IPO : दीपक बिल्डर्स अँड इंजिनिअर्सचा आयपीओ उघडताच पूर्णपणे सबस्क्राइब झाला. एका तासात आयपीओची रिटेल कॅटेगरी १०० टक्क्यांहून अधिक सब्सक्राइब झाली. यापूर्वी कंपनीचा आयपीओ १८ ऑक्टोबर रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला करण्यात आला होता. त्यानंतर कंपनीनं अँकर गुंतवणूकदारांकडून ७८.०१ कोटी रुपये गोळा केले.

कोणत्या विभागात किती सब्सक्रिप्शन?

रिटेल कॅटेगरीत दीपक बिल्डर्स अँड इंजिनिअर्सचा आयपीओ सकाळी १.८१ पट सब्सक्राइब झाला. क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्स श्रेणीत आयपीओ अद्याप गुंतवणूकदारांच्या प्रतीक्षेत आहे. नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्स श्रेणीत आयपीओ ०.८१ पट सब्सक्राइब झाला. पहिल्या तासात आयपीओ १०० टक्के भरला होता.

प्राइस बँड किती?

कंपनीनं या आयपीओसाठी १९२ ते २०३ रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे. एका लॉटमध्ये ७३ शेअर्सचा समावेश आहे. ज्यामुळे गुंतवणूकदारांना किमान १४,८१९ रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. आयपीओची साईज २६०.०४ कोटी रुपये आहे. कंपनी १.०७ कोटी रुपयांचे नवे शेअर्स जारी करणार आहे. तर ऑफर फॉर सेल अंतर्गत २१ लाख शेअर्स जारी केले जातील.

ग्रे मार्केटमध्ये कंपनीची स्थिती काय?

दीपक बिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेडचा आयपीओ ६० रुपयांच्या प्रीमियमवर व्यवहार करत आहे. गेल्या तीन दिवसांपासून या आयपीओचा जीएमपी बदललेला नाही.

तज्ज्ञांचं मत काय?

ब्रोकरेज हाऊस स्वस्तिक इन्व्हेस्टमार्टनं या आयपीओचं मूल्यांकन योग्य असल्याचं म्हटलं. तर कंपनी उत्तर भारतात इंजिनीअरिंग आणि बांधकाम सेवांमध्ये विस्तार करत आहे. कंपनीचा महसूल आणि नफा चांगला राहील. परंतु, या आयपीओमध्ये जोखीम घटकदेखील आहेत. जिथे एखादी कंपनी कार्यरत आहे, तिथे स्पर्धा वाढलीये. तसंच कंपनीचं सरकारी कामावर अवलंबित्वही आहे, असंही त्यांनी नमूद केलंय.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तीक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Deepak Builders and Engineers IPO 100 percent subscribed at opening retail investors jump whole quota booked How much is GMP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.