Defence Stocks: डिफेन्स कंपन्यांच्या शेअर्ससाठी शुक्रवारचा दिवस चांगला ठरला. या काळात बड्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती तब्बल १० टक्क्यांनी वाढल्या. पारस डिफेन्स असो वा माझगाव, सर्वच कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती वाढल्या आहेत. डिफेन्स कंपन्यांच्या शेअर्सचा वेग बराच काळ मंदावला होता.
पारस डिफेन्सचे शेअर्स
कंपनीचा शेअर शुक्रवारी बीएसईमध्ये १०५५ रुपयांच्या पातळीवर उघडला. कंपनीचा शेअर ५ टक्क्यांनी वधारून १,१२४.७० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर बंद झाला. गेल्या 3 महिन्यांत कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत २१ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. मात्र, वर्षभर शेअर्स ठेवलेल्या गुंतवणूकदारांना अजूनही ५१ टक्के फायदा झाला आहे.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड
शुक्रवारी बीएसईवरया डिफेन्स कंपनीचा शेअर ४२३३.३५ वर उघडला. शुक्रवारी कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत २.७९ टक्क्यांची वाढ होऊन तो ४३५० रुपयांवर पोहोचला. गेल्या ३ महिन्यांत हा डिफेन्स स्टॉक १८ टक्क्यांनी घसरला होता.
कोचीन शिपयार्ड
काल या डिफेन्स कंपनीच्या शेअर्सला अपर सर्किट लागलं. त्यानंतर बीएसईमध्ये कंपनीच्या शेअर्सची किंमत १८४६.५५ रुपयांच्या पातळीवर पोहोचली. तीन महिन्यांत कंपनीच्या शेअरची किंमत १७ टक्क्यांनी घसरली आहे.
माझगाव डॉक
शुक्रवारी या डिफेन्स कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत १० टक्क्यांहून अधिक वाढ पाहायला मिळाली आहे. ज्यानंतर कंपनीच्या शेअर्सची किंमत ४४२०.१५ रुपयांच्या पातळीवर पोहोचली. गेल्या ३ महिन्यांत या कंपनीनं केवळ ८ टक्के परतावा दिला आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड
शुक्रवारी या डिफेन्स कंपनीच्या शेअर्सची किंमत २ टक्क्यांहून अधिक वधारली. ज्यानंतर बीएसईमध्ये कंपनीच्या शेअर्सची किंमत २७९ रुपयांच्या पातळीवर पोहोचली. गेल्या ३ महिन्यांत या डिफेन्स स्टॉकची किंमत ११ टक्क्यांपेक्षा कमी झालीये.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. या गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा किंवा जाणकारांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)